निरोगी समाजासाठी एक पाऊल; वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलचा उपक्रम

 निरोगी समाजासाठी एक पाऊल; वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलचा उपक्रम



कोल्हापूर ०७ प्रमोद पाटील 

जागतिक आरोग्य दिनानिमित्त वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमावेळी नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच नियमित तपासणी, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थित डॉक्टरांनी आरोग्य सेवांचे महत्त्व आणि आजच्या बदलत्या जीवनशैलीत स्वतःची काळजी घेण्याची गरज यावर भर दिला.

या कार्यक्रमाला संतोष कुलकर्णी, डॉ. विरेंद्र वनकुंद्रे, डॉ. आर्यन गुणे, डॉ. जमादार, डॉ. दिव्या, ज्योती तावरे (जिल्हा सचिव, आशा वर्कर), आसावरी सुतार, मनीषा रोटे, राजेंद्र मकोटे यांच्यासह पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. युवराज मोरे, उपाध्यक्ष नियाज जमादार, सचिव सागर ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करत समाजात आरोग्य जनजागृती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.