आजचे राशिभविष्य
शुक्रवार, १३ मार्च २०२६
आज फाल्गुन कृष्ण दशमी असून आज वृद्धी तिथी आहे. विश्वावसुनाम संवत्सर (शके १९४७, संवत २०८२) सुरू आहे. आज व्यतिपात योग शांती असून चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. त्यामुळे आज जन्मलेल्या बाळाची राशी धनु राहील. ग्रहस्थितीनुसार चंद्र लाभ बुध आणि चंद्र प्रतियुती गुरू असा योग आहे.
राशीभविष्य
मेष : नशिबाची चांगली साथ मिळेल. बुधाच्या शुभयोगामुळे व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. लाभाचे योग आहेत.
वृषभ : अष्टम स्थानी चंद्र असल्याने आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. कामात अडथळे येतील, मात्र संयम ठेवल्यास मार्ग निघेल.
मिथुन : जोडीदाराची साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान वाढेल. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत.
कर्क : शत्रूंवर विजय मिळवाल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल, पण समाधान मिळेल.
सिंह : संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. बुद्धीचा वापर करून कठीण कामे पूर्ण कराल. कला क्षेत्रात संधी मिळतील.
कन्या : घरगुती कामात व्यस्त राहाल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
तूळ : भावंडांशी संबंध सुधारतील. पराक्रमात वाढ होईल. छोटे पण फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : धनलाभाचे योग आहेत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
धनु : तुमची राशी आणि तुमचेच नक्षत्र असल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल.
मकर : अनावश्यक खर्च टाळा. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होऊ शकते. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल.
कुंभ : उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मित्रांसोबत आनंदाचा वेळ घालवाल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल.
मीन : कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल.
📞 कुंडली परीक्षणासाठी संपर्क :
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521



