महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे : डॉ. गीता पिल्लई; महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

 महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे : डॉ. गीता पिल्लई; महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम



कोल्हापूर ०८ मिलिंद कुलकर्णी 

 जागतिक महिला दिनानिमित्त मुस्लिम प्रोग्रेसिव महासंघाच्या वतीने महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. गीता पिल्लई उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित तपासणी आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास महिलांचे आयुष्य अधिक निरोगी आणि सक्षम होऊ शकते. महिलांनी स्वयंपूर्ण होऊन कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलावा, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम प्रोग्रेसिव महासंघाचे अध्यक्ष फारुख मुल्ला होते. यावेळी फारुख हुदली, आसिफ मुजावर, फिरोज सौदागर, मुबारक मुल्ला, अजिज मिरजकर, माजी नगरसेविका वहिदा सौदागर, अॅडव्होकेट आसमा गिलेरिया, महेंद्र कांबळे, स्वाती शहा, रोहित सोनुले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजातील महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी, असा संदेशही देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.