आजचे राशिभविष्य –
सोमवार, ९ मार्च २०२६
फाल्गुन कृष्ण षष्ठी | विश्वासूनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२
राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.००
आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे.
संत एकनाथ महाराज षष्ठी
चंद्रनक्षत्र – विशाखा (दुपारी ४.१२ नंतर अनुराधा)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ (सकाळी ९.३० नंतर वृश्चिक)
(व्याघात योग शांती करून घेणे)
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
दिवसाच्या सुरुवातीला थोडे संमिश्र ग्रहमान राहील. महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. चंद्र त्रिकोण शुक्र व शनीमुळे कामात स्थैर्य येईल. व्यावसायिक संधी मिळतील आणि मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
सप्तम स्थानी चंद्र असल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. भागीदारीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात प्रगती होईल. संध्याकाळनंतर अनुकूल घटना घडतील.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
षष्ठ स्थानी चंद्र असल्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. बुध त्रिकोण गुरूमुळे बुद्धीचा योग्य वापर करून अडचणी सोडवाल. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
पंचम स्थानी चंद्र असल्याने सर्जनशील कामात प्रगती होईल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
चतुर्थ स्थानी चंद्र असल्यामुळे घरगुती आनंद वाढेल. मालमत्ता किंवा वाहन विषयक चर्चा पुढे सरकेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
तृतीय स्थानी चंद्र असल्याने धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन संपर्कातून लाभ मिळतील. संशोधन व अभ्यासात यश मिळेल.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
द्वितीय स्थानी चंद्र असल्याने आर्थिक व्यवहारातून लाभ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. बोलण्यामुळे मान-सन्मान वाढेल.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
तुमच्या राशीत चंद्र येत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. संध्याकाळनंतर शुभ घटना घडतील.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
व्यय स्थानी चंद्र असल्यामुळे खर्च वाढू शकतो. प्रवासाचे योग संभवतात. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
लाभ स्थानी चंद्र असल्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. नवीन संधी प्राप्त होतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
दशम स्थानी चंद्र असल्यामुळे नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाचा ताण वाढेल, मात्र त्यातून लाभही मिळेल.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
नवम स्थानी चंद्र असल्यामुळे भाग्याची साथ मिळेल. प्रवासातून लाभ होईल. धार्मिक कार्यात मन लागेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521
टीप: नावाच्या अक्षरावरून राशी वेगळी असू शकते. अधिक माहितीसाठी “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.



