सात वर्षाखालील मुला मुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अथर्वराज व सनया अजिंक्य

 रोटरी व रोटरक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन पुरस्कृत सात वर्षाखालील मुला मुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अथर्वराज व सनया अजिंक्य तर तनिशा व रुद्रला उपविजेतेपद या चौघांची निवड राज्य स्पर्धेसाठी

सात वर्षाखालील कोल्हापूर जिल्हातील निवडण्यात आलेले बुद्धिबळपटू बसलेले डावीकडून तनिषा चौगुले, शनाया मालानी, अथर्वराज ढोले व रुद्र चव्हाण, पाठीमागे उभे राहिलेले प्रमुख पाहुणे,पंच व संयोजक


कोल्हापूर २९ प्रमोद पाटील 

 विझार्ड चेस क्लब, राजारामपुरी 9 वी गल्ली येथे चेस असोशिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने घेतलेली सात वर्षाखालील मुलामुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाली.या स्पर्धा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन फिनिक्स यांनी पुरस्कृत केल्या होत्या. 

आज झालेल्या मुलांच्या गटातील अंतिम पाचव्या फेरीत पहिल्या पटावर पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या कोल्हापूरच्या अथर्वराज ढोले ने गारगोटीच्या ओजश खोपडे वर विजय मिळवित पाच पैकी पाच गुण मिळवून अजिंक्यपद निश्चित केले.दुसऱ्या पटावर सर्वोदय जीवन स्कूल गडहिंग्लज च्या आरुष पाटीलचा पराभव पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या अद्वैत कुलकर्णी ने केला तर तिसऱ्या पटावर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या रुद्र चव्हाणने इचलकरंजीच्या जयवर्धन भोसले वर मात केली..रुद्र चव्हाण व अद्वैत कुलकर्णी या दोघांचे समान चार गुण झाले होते.सरस बकोल्झ चौदा टायब्रेक गुणानुसार रुद्र चव्हाणला उपविजेतेपद मिळाले तर अद्वैत कुलकर्णीला तेरा टायब्रेक गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.मुलींच्या गटात अंतिम चौथ्या फेरीमध्ये पहिल्या पटावर किड्झ विला स्कूल इचलकरंजीच्या शनाया मालानी ने विबग्योर स्कूलच्या मिनाक्षी पिलाई चा पराभव करुन चार पैकी चार गुण करून अजिंक्यपद मिळविले.दुसऱ्या पटावर बडस् इंटरनॅशनल स्कूलच्या तनिशा  चौगुले ने माई बाल विद्यामंदिर इचलकरंजीच्या प्रज्ञा सलगरवर विजय मिळविला.तिसऱ्या पटावर किडझी स्कूलच्या चार्मी शहा ने विब्गौर स्कूलच्या अद्विता परिख चा पराभव केला‌ तर चौथ्या पटावर विब्गौर स्कूलच्या आयान्तीका पिलानी ने कोल्हापूर च्या नायरा शेलार वर विजय मिळवला.तनिषा,चार्मी व आयांतिका या तिघींचे समान तीन गुण झाल्यामुळे सरस नऊ बकोल्झ टायब्रेक गुणानुसार तनिशाला उपविजेतेपद मिळाले तर चार्मी साडेसात व आयांतिका साडेपाच बकोल्झ गुणासह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर राहील्या.स्पर्धा विजेत्याना रोख एक हजार रुपये व चषक तर उपविजेत्यांना रोख पाचशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचा बक्षीस स्मारक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी,माजी अध्यक्ष शरद पाटील, सचिव बी.एस.शिम्पूगडे,असिस्टंट गव्हर्नर रो.गौरी शिरगांवकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन फिनिक्स चे सचिव श्रीकुमार त्रमाबाडीया यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर मनिष मारुलकर,धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे,अनिश गांधी व विजय सलगर उपस्थित होते.

दिनांक तीन व चार ऑगष्ट रोजी पालघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला-मुलींच्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खालील खेळाडूंची निवड झाली आहे.

मुले :- 1)  अथर्वराज ढोले पोदार इंटरनॅशनल स्कूल 2) रुद्र चव्हाण घोंगावत इंटरनॅशनल स्कूल

मुली :-1) शनाया मालानी किड्स विला इचलकरंजी 2) तनिषा चौगुले बडस् इंटरनॅशनल स्कूल

उत्तेजनार्थ बक्षिसे :-

मुले :-  अद्वैत कुलकर्णी पोदार इंटरनॅशनल स्कूल,ओजस खोपडे मिंडे गारगोटी, आरुष पाटील सर्वोदय जीवन स्कूल गडहिंग्लज ,  रिधान कारवा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल,  आदिराज डोईजड तात्यासाहेब कोरे इंग्लिश स्कूल, वारणानगर

मुली :- चार्मी शहा किड्झी इचलकरंजी, आयांतिका पिलानी विबग्योर, प्रज्ञा सलगर माई बाल विद्यामंदिर, इचलकरंजी

मिहिका सारडा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, मीनाक्षी पिलाई विबग्योर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.