केडीसीसी बँकेच्यावतीने सीबीएस परिसरात फेरीवाले, छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी व उद्योजकांना क्यूआर कोडचे वाटप

      

     

केडीसीसी बँकेच्यावतीने सीबीएस परिसरात फेरीवाले, छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी व उद्योजकांना क्यूआर कोडचे वाटप

               

कोल्हापूर- केडीसीसी बँकेच्यावतीने फेरीवाले, छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी व उद्योजकांना सीबीएस परिसरात क्यू. आर. कोडचे वाटप झाले. यावेळी फेरीवाला संघटनेचे नेते दिलीप पवार, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल येडगे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे, सुनील वरूटे आदी प्रमुख.



           

कोल्हापूर, दि. ३१ प्रमोद पाटील 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आमच्या हक्काची स्थानिक बँक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेचे नेते कॉम्रेड दिलीप पवार यांनी केले.  ही बँक शेतकऱ्यांसह छोटे-मोठे दुकानदार,न व्यापारी व उद्योजक अशा समाजातील सर्वच घटकांना अखंडपणे सेवा देत आली आहे, असे ते म्हणाले.                                

         

कोल्हापुरात सीबीएस परिसरात केडीसीसी बँकेच्यावतीने छोटे-मोठे दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी व उद्योजकांना क्यू. आर. कोडचे वाटप करण्यात आले. ही बँक

                 

कॉम्रेड श्री. पवार पुढे  म्हणाले, परदेशी आणि बाहेरील बँका निव्वळ नफेखोरीच्या उद्देशाने येऊन व्यवसाय करीत आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्यांसह शेतकरी आणि उद्योजक- व्यापाऱ्यांसाठी काम करणारी बँक आहे. या बँकेच्या क्यू. आर. कोडच्या माध्यमातून पिग्मीमध्ये बचत करा आणि व्यवसाय मोठा करा, असेही ते म्हणाले.

             

बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली केडीसीसी बँकेने गरुडझेप घेतलेली आहे. शेतकऱ्यांसह समाजातील सर्वच घटकांसाठी जिल्हा बँक कार्यरत आहे. आमच्या बँकेत मोठा ग्राहक आणि छोटा ग्राहक असा दुजाभाव केला जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या एका- एका शाखेत सरासरी अकरा हजाराहून अधिक वैयक्तिक लाभाच्या पेन्शन योजना अनुदानाची खाती आहेत. आम्ही त्यांना प्रामाणिकपणे सेवा देण्यात कधीच कमी पडत नाही, असेही ते म्हणाले.

            

श्री. जी. एम. शिंदे म्हणाले, बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली क्यू.आर. कोड ही संकल्पना आहे. छोटे-मोठे दुकानदार, व्यावसायिक व उद्योजक आपला व्यापार -धंदा सोडून पिग्मी भरण्यासाठी बँकेत येऊ शकत नाहीत. क्यू. आर. कोडच्या माध्यमातून त्यांचा पैसा पिग्मी एजंटशिवाय त्यांच्या खात्यावर जमा होईल आणि बचत होईल. या पिग्मीवर कर्ज सुविधाही उपलब्ध आहे.

                  

*त्यांना शोधणार कुठे....?* 

श्री. पवार म्हणाले, निव्वळ नफेखोरीच्या उद्देशाने येणाऱ्या परदेशी व बाहेरील बँका आणि स्थानिक केडीसीसी बँक यांच्या कार्यपद्धतीमध्ये फरक आहे. काही अडचण निर्माण झाल्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपण विचारू शकतो. त्या बँकांच्या पदाधिकाऱ्यांना शोधणार कुठे? यापूर्वी काही बाहेरच्या बँका आल्या आणि आमच्या लोकांच्या ठेवी घेऊन गेल्या त्या आजतागायत पुन्हा आल्याच नाहीत. ते पैसे बुडालेच. असे अनुभवही ठेवीदारांच्या गाठीशी आहेत.

            

यावेळी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल येडगे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे,  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे, व्यवसाय विकास कक्षाचे व्यवस्थापक सुनील वरूटे, रघुनाथ कांबळे, मुख्य शाखेचे शाखाधिकारी प्रभाकर पिसे, आर्थिक साक्षरता विभागाचे प्रमुख राणोजी चव्हाण, सुजय पवार, रणधीर साळुंखे, सुधाकर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.