बंगाली कारागिरांच्या उत्सव मंडळाच्या दुर्गादेवीचे पाट पूजन उत्साहात



बंगाली कारागिरांच्या उत्सव मंडळाच्या दुर्गादेवीचे पाट पूजन उत्साहात

कोल्हापुरात गुजरी येथील बंगाली कारागिरांच्या बसविण्यात येणाऱ्या दुर्गादेवीच्या पाट पूजनप्रसंगी अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक यांच्यासह अन्य पदाधिकारी.


 



कोल्हापूर, ता. २७ प्रमोद पाटील 

येथील सार्वजनिक श्री दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने बसविण्यात येणाऱ्या दुर्गादेवीच्या पाट पूजनाचा कार्यक्रम मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उत्साहात झाला. मंडळाचे यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.


या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गुजरी येथील बंगाली कारागिरांच्या वतीने उत्सव आयोजित केला जातो. दरम्यान, सोमवारी रात्री कोलकत्याहून आणलेली मातीमध्ये धार्मिक विधीनंतर विधिवत मूर्ती बनविण्यास सुरवात झाली. मंडळाने २५ व्या वर्षात पदार्पण केल्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  


यावेळी मंडळाचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, देबाशिष डेनरिया, सचिव संदीप मंडल, खजानिस गौरव भुनिया, इंद्रजित सामंत यांच्यासह सदस्य उपस्थित होते.


अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक म्हणाले, कामाच्या व्यापामुळे सर्वांना गावी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे येथेच मूर्तीची प्रतिष्ठापना करून धार्मिक विधी होतील. ७ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत दैवज्ञ बोर्डिंग येथे उपस्थित राहून दुर्गादेवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.