आजचे राशिभविष्य
०८ मार्च २०२६
फाल्गुन कृष्ण पंचमी | विश्वासूनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२
आज रंगपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.
राहुकाळ: दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
नक्षत्र: स्वाती (दुपारी १.३२ पर्यंत) नंतर विशाखा
आज जन्मलेल्या बाळाची राशी: तूळ
टीप: दुपारी २.०० पर्यंत दिवस विशेष अनुकूल
सूचना: ध्रुव योग शांती करून घेणे शुभ
(टीप: नावाप्रमाणेच तुमची राशी असेलच असे नाही.)
मेष
(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
रवी त्रिकोण चंद्र आणि चंद्र त्रिकोण बुधामुळे आज योग्य निर्णय घ्याल. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. सन्मान आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ
(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
संमिश्र दिवस. कामात प्रगती होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
मिथुन
(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
उत्तम दिवस. वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. विचार स्पष्ट होतील. नवीन संपर्कातून लाभ मिळेल. भावंडांची भेट होण्याची शक्यता.
कर्क
(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
आज चांगले अनुभव येतील. उद्योग-व्यवसायात प्रगती होईल. चंद्र त्रिकोण गुरूमुळे भाग्याची साथ मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.
सिंह
(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
कामाचा वेग वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. घरात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या
(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
चंद्र अनुकूल असल्याने आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता. सरकारी कामात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. वाहन सुख मिळेल.
तुळ
(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. अभ्यास आणि संशोधनात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक
(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
संमिश्र दिवस. खर्च वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.
धनु
(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. समाजकार्यात सहभाग वाढेल.
मकर
(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. जबाबदाऱ्या वाढतील.
कुंभ
(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
भाग्याची साथ मिळेल. प्रवासातून लाभ होईल. धार्मिक कार्यात मन लागेल. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल.
मीन
(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
संमिश्र दिवस. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. योग्य सल्ला घेतल्यास निर्णय यशस्वी ठरतील.
ज्योतिषी : मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 संपर्क : 8087520521
कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय मार्गदर्शन तसेच “राशीभाव” कार्यक्रम बुकिंगसाठी फेसबुक पेजला भेट द्या.



