श्री संभवनाथ मंदिर ट्रस्ट गुजरीत आचार्य राजरत्नसुरिश्वरजी यांचा चातुर्मास प्रवेश


श्री संभवनाथ मंदिर ट्रस्ट गुजरीत आचार्य राजरत्नसुरिश्वरजी यांचा चातुर्मास प्रवेश


कोल्हापूर १२ प्रमोद पाटील 

समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी , आत्मकल्याण साधनेसाठी धार्मिकतेला फार महत्त्व आहे . जैन धर्मात चातुर्मास समतुल्य चार महिन्याच्या कालावधीला वर्षायोग म्हणतात. याचे पालन जास्तीत जास्त जैन साधू-  साध्वीश्री यांच्याकडून होत असते. पावसाळ्यामध्ये अनेक किटकांचा जन्म होतो. त्यामुळे आपणाकडून त्यांची हिंसा होऊ नये, यासाठी ते एका ठिकाणी वास्तव्यास राहतात.  तेथील समाजामध्ये धार्मिक जागृती निर्माण करतात . रोज प्रवचन ठेवण्यात येते . यामध्ये श्रावक श्राविका उपस्थित असतात.  यावर्षी श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट , गुजरी , कोल्हापूर येथे आचार्य राजरत्नसुरिश्वरजी आदी ठाणा यांचा भव्यातिभव्य प्रवेश संपन्न झाला , बिंदू चौक येथून ढोल ताशांच्या गजरात सर्व युवक-युवती मंडळे यांच्या सहकार्याने साधु- साध्वी, श्रावक-श्राविका यांच्यासह कोल्हापूर मधील श्रद्धाळू समाज उपस्थित होते.


श्री संभवनाथ ट्रस्ट येथे प्रवेश झाल्यानंतर आचार्य राजरत्नसुरिजी महाराज यांचे मांगलीक प्रवचन झाले . सर्व श्रद्धाळूंनी यावेळी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर साधर्मिक भक्ती संपन्न झाली. यावेळी सकल श्री संघ , श्रावक श्राविका उपस्थित होते.

 कोल्हापूर हे धार्मिक परंपरा जपणारे शहर असल्याचे सांगत समाजामध्ये एकता आहे तसेच युवावर्ग देखील अग्रेसर असल्याचे मनोगत महाराजांनी मांडले . चातुर्मास काळात सिद्धीतप,दैनिक प्रवचन , प्रश्नोत्तरी,  गिरनार भवयात्रा, श्री नेमिनाथ जन्मकल्याणक , शिबिर , एक करोड आठ लाख नवकार महामंत्र, युवा प्रवचन आदी कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.