आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

मंगळवार, १७ मार्च २०२६ – राशिभविष्य



फाल्गुन कृष्ण त्रयोदशी | शके १९४७ | संवत २०८२ | शिशिर ऋतू | विश्वावसुनाम संवत्सर

राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३०
सूचना: आज वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाची कामे विचारपूर्वक करा. अडथळे येण्याची शक्यता आहे.

चंद्रनक्षत्र: शततारका
चंद्रस्थिती: चंद्र-मंगळ व चंद्र-बुध युती


🔮 १७ मार्च रोजी जन्मलेल्यांचे वैशिष्ट्य

आज जन्मलेले व्यक्ती बुद्धिमान, संशोधक वृत्तीचे आणि स्पष्टवक्ते असतात. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, ज्योतिष यामध्ये विशेष रुची असते. स्वाभिमानी स्वभाव, सामाजिक कार्याची आवड आणि धाडसी निर्णय ही तुमची ओळख.
जीवनात संघर्ष असला तरी ३२ नंतर भाग्योदय होतो.

आरोग्य: रक्तदाब, डोकेदुखी, पोटाचे विकार याकडे लक्ष द्या.
शुभ दिवस: मंगळवार, बुधवार, शनिवार
शुभ रंग: निळा, हिरवा, जांभळा


♈ आजचे राशिभविष्य

मेष

संमिश्र दिवस. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. प्रवासाची शक्यता. राग टाळा.

वृषभ

कामात प्रगती. वरिष्ठांची साथ. आर्थिक लाभ संभव, पण खर्च वाढेल.

मिथुन

बुद्धीला चांगला वाव. नवीन योजना यशस्वी. शिक्षण-लेखनात प्रगती.

कर्क

कामाचा ताण वाढेल. संयम आवश्यक. गोड बोलल्याने कामे मार्गी लागतील.

सिंह

लाभदायक दिवस. आर्थिक प्रगती व मान-सन्मान. प्रवास संभव.

कन्या

सरकारी कामे पूर्ण. अभ्यास- संशोधनात यश. मेहनतीचे फळ मिळेल.

तुळ

व्यवसायात बदलाची शक्यता. नवीन कल्पना सुचतील. समाजात मान वाढेल.

वृश्चिक

स्पर्धा वाढेल पण धाडसाने यश. वाहन खरेदीचा विचार.

धनु

धार्मिक कार्यात रुची. प्रवास व भाग्याची साथ. योजना यशस्वी.

मकर

संमिश्र दिवस. खर्च वाढेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात.

कुंभ

चंद्र राशीत असल्याने मन अस्थिर. धाडसी निर्णय यशस्वी, पण वाद टाळा.

मीन

ताण वाढेल. गुप्त शत्रूंपासून सावध रहा. आर्थिक व्यवहार जपून करा.


✍️ ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 संपर्क: 8087520521



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.