सायमलटेनियस बुद्धिबळाचे शिवाजी स्टेडियम वर नाविन्यपूर्ण सुंदर प्रदर्शन

 चाटे शिक्षण समूह पुरस्कृत सायमलटेनियस बुद्धिबळाचे शिवाजी स्टेडियम वर नाविन्यपूर्ण सुंदर प्रदर्शन;  या उपक्रमाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठीजागतिक बुद्धिबळ संघटने कडे सादर

बुद्धिबळाच्या पटावर चाल करून सायमल बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष राहुल चिकोडे व क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यावेळी डावीकडून अनिश गांधी भरत चौगूले,मनीष मारुलकर,धीरज वैद्य, उमेश पाटील, उत्कर्ष लोमटे सोहम खासबागदार व रविंद्र निकम...


कोल्हापूर २१ प्रमोद पाटील

 चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त व जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्थापनेच्या शताब्दी निमित्त आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण सायमलटेनियस (एका खेळाडूने एकाच वेळी अनेक खेळाडूशी खेळणे) बुद्धिबळाचे प्रदर्शन उत्तम प्रकारे पार पडले‌.हा उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी फिडेकडे पाठविण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी सह सोहम खासबारदार, उत्कर्ष लोमटे व रवींद्र निकम या अनुभवी खेळाडूंनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवीत एकावेळी 15 खेळाडूची लढत दिली.

सायमल बुद्धिबळ स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी पाठीमागे उभे राहीलेले बक्षीस विजेते बसलेले पंच व संयोजक


या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष राहुल चिकोडे व क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनीष मारुलकर, धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे, करण परीट, आरती मोदी, उमेश पाटील, अनिश गांधी, सोहम खासबारदार,रवींद्र निकम व किरण शिंदे उपस्थित होते.चित्तथरारक झालेल्या लढतीत सुरुवातीला अनिश गांधीने ट्रायल स्वरूपात प्रदर्शन घडवले‌.त्यानंतर सोहम खासबारदार व रवींद्र निकम यांनी सायमलटेनियस प्रत्येकी 15 खेळाडूंशी लढत दिले.यामध्ये सोहमने  14 - 1 एक गुण फरकाने लढत जिंकले‌ तर रविंद्र ने 12.5 - 2.5 फरकाने विजय मिळवला.आदित्य आळतेकर ने सोहमचा पराभव केला तर  सृष्टी जोशी राव व अंशुल चुयेकर ने रवींद्रवर मात केली‌ आणी कागलच्या स्वरुप जोशी ने रविंद्र ला बरोबरीत रोखले.दुपारी जेवणानंतर अनिश गांधी व उत्कर्ष लोमटे यांनी सायमल दिला.अनिश ने एकतर्फी 15 विरुद्ध 0 ने लढत जिंकली तर उत्कर्षने पंधरा विरुद्ध एक फरकाने विजय नोंदविला. अथर्व गोडसेने वेळेच्या बंधनात उत्कर्ष लोमटे वर विजय मिळविला. विजय मिळवलेल्या खेळाडूस पाचशे रुपये व बरोबरी केलेल्या खेळाडूस तीनशे रुपये चे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दिविज कात्रुट या आठ वर्षाच्या मुलाने पराभूत होताना चांगली लढत दिली म्हणून त्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

आदित्य आळतेकर,धीरज वैद्य,स्वरूप जोशी, रितेश केसरे, अर्णव पोर्लेकर, अथर्व गोडसे, रवी आंबेकर व रवींद्र कुलकर्णी या आठ आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळपटूसह अंशुल चुयकर, सृष्टी जोशी राव, ध्रुव भोसले, श्रीराज देसाई,अवनीश जितकर, अखिलेश जावळे, स्नेहल गावडे, निशांत धामणीकर, सुकांत डुणुंग, अद्वेत कुलकर्णी, दिविज कात्रुट, शुभान भोकरे, अर्णव नांगुरकर, तनिष्क साळुंखे, अनिकेत पाटील, निश्रा ओसवाल, शनया भास्कर, संदेश पाटील, राजवर्धन पोवार, ऋतुराज भोसले, आदिराज पाटील, समरवीर गुंदेशा हे 30 खेळाडू सायमल मध्ये सहभागी झाले होते या सहभागी सर्व खेळाडूंना फिडेचे ऑनलाईन प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.