रेसिडेन्सी क्लब पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा भव्य खुल्या निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी कोल्हापुरात

 जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त कोल्हापुरातील बुद्धिबळ महोत्सवाअंतर्गत

रेसिडेन्सी क्लब पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा भव्य खुल्या निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी कोल्हापुरात



कोल्हापूर १९ प्रमोद पाटील 

चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने रविवार दिनांक 21 जुलै रोजी रेसिडेन्सी क्लब ताराबाई पार्क येथे कोल्हापूर जिल्हा भव्य खुल्या निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे.जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने शनिवारपासून आयोजित केलेल्या बुद्धिबळ महोत्सवाअंतर्गत या स्पर्धा होत आहेत‌.रेसिडेन्सी क्लब ने या स्पर्धा पुरस्कृत केल्या आहेत. 

स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत.स्पर्धा विजेत्यांसाठी पंधरा हजार रुपयाची एकूण रोख बक्षीसे व चषक आणि मेडल्स दिली जाणार आहेत. मुख्य व उत्तेजनात मिळून एकूण 54 बक्षिसे आहेत.

  •  मुख्य बक्षिसामध्ये पहिल्या 11 क्रमांकांना बक्षिसे पुढीलप्रमाणे 1)रु.3000/- व चषक 2) रु.2000/- व चषक 3)रु.1500/- व चषक 4)रु.1000/-  5)रु.700/- 6) रु.600/ 7)रु.500/-  8)रु‌.400/- क्रमांक 9 ते 11 प्रत्येकी रु.300/-

उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून उत्कृष्ट साठ वर्षावरील जेष्ठ बुद्धिबळपटू ,उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू व उत्कृष्ट ग्रामीण बुद्धिबळपटू या प्रत्येक गटासाठी रोख पाच बक्षिसे ठेवली आहेत. त्याचबरोबर 7, 9, 11, 13 व पंधरा वर्षाखालील मुलांच्या प्रत्येक गटात पहिल्या पाच क्रमांकास चषक व मेडल उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. याशिवाय तीन उत्कृष्ट शाळांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस चषक म्हणून दिले जाणार आहे. सर्व स्पर्धकांना दुपारी लाईट लंच व संध्याकाळी चहा मोफत दिला जाणार आहे‌.

फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंनाच यामध्ये भाग घेता येईल.भाग घेण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे.शनिवार दि‌.20 जुलै रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह गुगल फॉर्म भरून नाव नोंदवावीत.प्रवेश फी आरती मोदी 8149740405 यांच्याकडे गुगल पे ने भरावी. 

अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.

1)आरती मोदी - 8149740405

 2)मनीष मारुलकर - 9922965173 

3)उत्कर्ष लोमटे - 9923058149 

4)प्रीतम घोडके - 8208650388 

5) रोहित पोळ - 9657333926

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.