“सेवेची परंपरा, भाविकांचा आधार” — झंवर उद्योग समूहाची १३ वर्षांपासून मोफत बस सेवा; पर्यावरणपूरक उपक्रमही गाजतोय

  “सेवेची परंपरा, भाविकांचा आधार” — झंवर उद्योग समूहाची १३ वर्षांपासून मोफत बस सेवा; पर्यावरणपूरक उपक्रमही गाजतोय



कोल्हापूर ०१ मिलिंद कुलकर्णी 

श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या सेवेसाठी झंवर उद्योग समूह पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पंचगंगा नदी घाट ते जोतिबा डोंगर असा मोफत बससेवेचा उपक्रम यंदाही सुरू ठेवण्यात आला असून, गेली सलग १३ वर्षे ही सेवा अखंडपणे सुरू आहे.



यात्रेदरम्यान डोंगर चढताना अनेक भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत आहे. सुरक्षित आणि विनामूल्य प्रवासामुळे भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

दरम्यान, केवळ वाहतूक सुविधेपुरतेच मर्यादित न राहता झंवर उद्योग समूहाने पर्यावरण जपण्याचाही संदेश दिला आहे. भाविकांना पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्त यात्रा घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवणाऱ्या झंवर उद्योग समूहाचा हा उपक्रम यात्रेत एक वेगळी ओळख निर्माण करत असून, भाविकांच्या सेवेसाठी त्यांची ही निस्वार्थ धडपड कौतुकास्पद ठरत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.