आजचे राशिभविष्य

 राशिभविष्य – शुक्रवार, ३ एप्रिल २०२६





चैत्र कृष्ण प्रतिपदा | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर
शके १९४८ | संवत २०८२

राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
चंद्र नक्षत्र: चित्रा (संध्याकाळी ७.२५ नंतर स्वाती)
आजचा दिवस: उत्तम

आज जन्मलेल्या बाळाची राशी: तुळ (व्याघात योग शांती)


♈ मेष

सहकाऱ्यांकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. काव्य आणि शास्त्रात रुची वाढेल.

♉ वृषभ

बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नातेवाईकांशी संपर्क वाढेल.

♊ मिथुन

राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

♋ कर्क

विद्या आणि ज्ञानप्राप्तीसाठी उत्तम दिवस. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. वाहनसुख लाभेल.

♌ सिंह

नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. कर्जे मंजूर होण्याची शक्यता. सामाजिक प्रगती होईल.

♍ कन्या

मान-सन्मान मिळेल. दूरच्या ठिकाणांहून संपर्क येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.

♎ तुळ

चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. लोकप्रियता वाढेल. यश आणि सन्मान मिळेल.

♏ वृश्चिक

सुरुवातीला अडचणी येतील पण नंतर अनुकूलता वाढेल. संयम ठेवा. संध्याकाळ आनंददायी असेल.

♐ धनु

कौटुंबिक आनंद मिळेल. सहजीवनात समाधान राहील. आर्थिक स्थिरता टिकून राहील.

♑ मकर

अनुकूल दिवस. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सर्व कामात यश मिळेल.

♒ कुंभ

धार्मिक आणि सामाजिक कार्यात रस वाढेल. बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल.

♓ मीन

दिवस मध्यम. घरगुती कामांवर लक्ष द्या. चुका टाळा. संयम आवश्यक.


🎂 ३ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

या दिवशी जन्मलेल्यांवर मंगळ आणि हर्षल (यूरेनस) ग्रहांचा प्रभाव असतो.
हे व्यक्ती महत्त्वाकांक्षी, मेहनती, स्पष्टवक्ते आणि उत्साही असतात. न्यायप्रियता, दानशूरता आणि मदतीची वृत्ती ही त्यांची खास ओळख आहे.

  • स्वभाव: शीघ्रकोपी पण दयाळू

  • गुण: आत्मविश्वास, नेतृत्व, प्रभावी संभाषण

  • आवडी: मैदानी खेळ, सामाजिक कार्य

  • स्वभाववैशिष्ट्य: स्वतंत्र विचारसरणी, मिश्किल स्वभाव

👉 मात्र हट्टीपणा आणि रागावर नियंत्रण ठेवले तर मोठी प्रगती शक्य.


💼 संभाव्य व्यवसाय

राजकारण, मंत्रीपद, न्यायव्यवस्था, सचिव, धार्मिक गुरु, सल्लागार, जाहिरात, अभिनय, व्यायाम शिक्षक.


🍀 शुभ गोष्टी

  • शुभ दिवस: मंगळवार, गुरुवार, शुक्रवार

  • शुभ रंग: किरमिजी


✍️ राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.