दिग्दर्शक अनंत महादेवन यांची श्री एकमुखी दत्त मंदिराला भेट
कोल्हापूर १८ मिलिंद कुलकर्णी
सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने कोल्हापूर येथे आगमन केले. यावेळी त्यांनी श्री एकमुखी दत्त देवस्थान मंदिराला भेट देत दर्शन घेतले.
मंदिरात आगमन झाल्यानंतर श्री एकमुखी दत्त देवस्थान मंदिराचे मठाधिपती संतोष गिरिगोसावी यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच मंदिराचा इतिहास, परंपरा आणि धार्मिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तगणांची उपस्थिती होती. अनंत महादेवन यांनी मंदिराच्या पवित्र वातावरणाबद्दल समाधान व्यक्त करत भाविकांसोबत संवाद साधला.
चित्रपटसृष्टीतील मान्यवर व्यक्तीच्या या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



