संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे मगरमठीमध्ये प्रगट दिनानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमांना सुरवात


संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे मगरमठीमध्ये प्रगट दिनानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमांना सुरवात 




कोल्हापूर, ता. ११ मिलिंद कुलकर्णी 

 संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे मगरमठीमध्ये प्रगट दिनानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमांना सुरवात झाली.  

सकाळी सहा वाजता अभिषेकने उत्सवास सुरवात झाली. त्यानंतर दहा वाजता ध्वजवंदन होऊन मेघडंबरी स्थापना करण्यात आली. त्यानंतर  ग्रंथ पारायण होऊन रात्री आठ वाजता हरिप्रिया महिला भजनी मंडळाचे भजन झाले. यानिमित्त विशेष अशी पूजाही करण्यात आली.

दरम्यान, १९ मार्चला सायंकाळी पालखी पूजन, प्रदक्षिणा २० मार्चला प्रगटदिन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. याचे आयोजन श्रीकांत मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.