राजेंद्र सावित्रीदेवी सदाशिव मकोटे.... पत्रकार सामाजिक जीवनातील एक ध्रुव तारा : पद्माकर कापसे



राजेंद्र सावित्रीदेवी सदाशिव मकोटे.... पत्रकार सामाजिक जीवनातील एक ध्रुव तारा... यांचा आज जन्मदिवस...


कोल्हापूर २६ 

प्रथम राजू उर्फ राजा मकोटे यांना जन्मदिवसाच्या प्रकटदिनाच्या शुभेच्छा देतो... राजू साहब आपकी जिंदगी बडी भी और लंबी ही होनी चाहीये...


कोल्हापूर पत्रकारिता मधील एक बुजुर्ग आणि प्रचंड ऊर्जा असणारा साऱ्याच क्षेत्रात वावर असणारा चतुरस्त्र अष्टपैलू आणि हरहुन्नरी अनुभवसम्पन्न 24 तास प्रसन्नता असणारा एक राजा माणुस..दिलं का राजा.. आमचा तुमचा सर्वांचा राजेंद्र उर्फ राजू मकोटे.... आजचा बर्थ डे बॉय...इतरांच्या वाढदिवसाच्या निमित्त खूपच उत्साही असणारा आनंद देणारा असा राजू मकोटे

आम्ही सांगून हा ग्रुप खास जन्मदिवसाचे छानपैकी नियोजन करण्यासाठी निर्माण केला पण... ऐनवेळी पुढील वर्षी पाहू म्हणून आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतोय नरसोबाची वाडी आणि दत्त महाराजांच पवित्र क्षेत्र अवदुंबर या ठिकाणी उभयतांनी राजू आणि सीमाताई मकोटे देवदर्शन करून साजरा करत आहेत.... साक्षात ही जोडी माऊली रूपातील ,रुक्मिणी आणि विठ्ठलाच्या रूपातील आहेत... त्यांचं जीवन समृद्ध भरभराटीचे जावो या शुभकामना करुयात....

राजू बद्द्ल आज मनात खुप काही उत्कट भावना दाटून आलाय...त्या एका समारंभात व्यक्त करायच्या आणि छानपैकी मकोटे मित्रपरिवारात गप्पांच्या मैफिलीत तो मस्तपैकी अल्पोपहार करून साजरा करण्याचा मानस होता.....पण


यंदाच्या वर्षी नको असं राजुच म्हणून गेला आणि मनातल्या गोष्टी राहून गेल्या... पण पुढच्या 26 मे ला राजाचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होणार त्यासाठी आपण सारेच संकल्प करुयात...


असो सतत हास्य चेहऱ्यावर सतत उत्साही भिरभिरणारा भ्रमंती करणारा सतत नाविन्यपूर्ण उपक्रमांनी सभोवताली प्रोत्साहित करणारा... झरझर वाहणारा निखळ नितळ आणि प्रचंड ध्यास घेणारा हा एक अवलिया... वेळेचं मात्र नियोजन करण्यात मात्र थोडीशी कुचराई होते अर्थात ते सुद्धा समजून घेणारी राजाची मित्रमंडळी.....दररोज नवनवीन संकल्पना घेऊन इतरांना कल्पना देऊन त्यांची पुर्ती करण्यासाठी पाठपुरावा करणारा रानावनात निसर्गाच्या सानिध्यात रममाण होणारा निसर्ग मित्र ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी मध्ये धाडसाने पुढाकार घेणारा संगीत कला नाटय आणि जनतेच्या आरोग्यासाठी सतत पुढाकार घेणारा एक दक्ष पत्रकार सामाजिक कार्यकर्ता..वेळप्रसंगी हजरजबाबी रोखठोकपणे आणि परखडपणे मत व्यक्त करून कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न डगमगता ठामपणे बाजू मांडणारा पण तितकाच सय्यमी सोशिक आणि सहनशीलता अंगी बाळगणारा असा आमचा दोस्त मित्र सहकारी आणि जिवाभावाचा भाऊ....


आज जन्मदिवस राजुचा त्याला उदंड निरोगी दीर्घायुरोगी आयुष्य लाभूदे हीच करवीरच्या आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो...

  एक मैतर दोस्त आणि रक्ताच्या नात्यातील नसेना

त्याहूनही पलिकडे असणारा माझा धाकटा भाऊ


   

    पद्माकर कापसे 

हृदयस्पर्श फाउंडेशन




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.