"स्वराज्य केसरी २०२४" : रविवारी कोल्हापुरात

"स्वराज्य केसरी २०२४" : रविवारी कोल्हापुरात



कोल्हापूर ५ प्रमोद पाटील 

 स्वराज्य केसरी २०२४ या मैदानाची सुरुवात रविवार, दि. ११ रोजी खासबाग मैदान येथे दुपारी ठिक २-०० वाजता होणार असून या मैदानास महाबली पैलवान हिंदकेसरी सतपाल हे प्रमुख उपस्थित असणार आहेत.

शककर्ते शिवछत्रपती महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक व राजर्षी शाहू छत्रपतीच्या १५० व्या जयंती वर्षाचा सुवर्णयोग साधत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे जंगी मल्लगुध्द होत आहे.


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने युवराज संभाजी छत्रपती वाढदिवस गौरव समितीच्या वतीने घेणेत येणाऱ्या या मैदानात प्रथम क्रमांक विजेत्यासाठी मानाची गदा व रोख मानधन ठेवले असून सर्वच सहभागी मल्लांना मानधन देवून सन्मानित करण्यात येणार आहे 

जवळपास १५० लढती होणार असून त्यामध्ये पुरुषांच्या १४४ आणि महिला मल्लाच्या ६ लढती होणार आहेत. येणाऱ्या सर्वच मल्लांना भारतीय पोस्टल आणि बजाज जनरल इन्शुरन्स तर्फे १० लाखाचा अपघाती विमा योजना देण्यात येणार आहे त्यासाठी येणाऱ्या मल्लांनी आपली आधार कार्ड घेऊन यावीत असेही संयोजन समिती मार्फत आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले . 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.