शहरातील दर्जेदार रस्त्यासाठी मनसे तर्फे जनजागृती अभिमान

 शहरातील दर्जेदार रस्त्यासाठी मनसे तर्फे जनजागृती अभिमान 





कोल्हापूर ११ प्रमोद पाटील   

     भारतीय स्वातंत्र्याच्या  ७७ वर्षांच्या  इतिहासात हजारो कोटी रुपयांचा शासकीय निधी खर्च करून सुद्धा आजही कोल्हापूर शहरात खड्ड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे

              यासाठी जबाबदार असणाऱ्या भ्रष्ट अधिकारी + दुष्ट ठेकेदार + पांढरपेशी अधिकारी यांच्या अभद्र  युतीला इथून पुढे कायमची अद्दल  घडवायची आहे. कोल्हापूरकरांच्या हक्काच्या शंभर कोटी मधील रस्ता दर्जेदार व मजबूत करून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जनजागृती अभियान राबवित आहोत          

             महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने केले नाही. अशा पद्धतीच्या या आंदोलनाचा प्रारंभ म्हणून शंभर कोटी रुपयांमधून शहरातील ज्या ज्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्या त्या रस्त्यांवर मनसे कोल्हापूरतर्फे त्या त्या रस्त्याच्या मंजूर अंदाजपत्रकामधील लांबी रुंदी कोणत्या गुणवत्तेची, किती थराचे किती साहित्य वापरून दर्जेदार रस्ता करण्याची मिलिमीटर मधील मापे त्याच्या नकाशासह मोठ्या डिजिटल आकाराच्या फलक स्वरूपात लावणार आहोत. तसेच ज्या रस्त्यांची कामे होणार आहेत. त्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या घरे व दुकानामध्ये पत्रके वाटप करणार आहोत.

           या पत्रकांमध्येही रस्त्यांच्या कामाच्या विस्तृत माहितीसह आंदोलनाचे नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष मा.राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष मा. प्रसाद पाटील यांच्या ९६८९६६५६६६ ,  ९३७१७२५११५ या व्हाट्सअप क्रमांकावर खड्डे मुक्त रस्ते असा संदेश पाठवल्यास त्या रस्त्यांच्या मंजूर कामाची विस्तृत माहिती त्या नागरिकांना पाठविणार असल्याने आम्हास संदेश पाठविण्याची विनंती देखील करीत आहोत 

            या आजवरच्या अनोख्या व आगळावेगळ्या शंभर कोटींच्या रस्त्यांच्या दर्जेदार व मजबूत रस्ते जनजागृती अभियानाचा प्रारंभ सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १:०० वाजता अर्धा शिवाजी पुतळा, निवृत्ती चौक,  छत्रपती शिवाजी पेठ, कोल्हापूर येथून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे.असे पत्रक शहर सचिव यतीन होरणे यांनी प्रसिद्धीस दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.