टिप्पर चालक किमान वेतन वर्क ऑर्डर त्वरित काढा, अन्यथा उपोषण : आप चा इशारा


टिप्पर चालक किमान वेतन वर्क ऑर्डर त्वरित काढा, अन्यथा उपोषण : आप चा इशारा



कोल्हापूर ५ प्रमोद पाटील 

महापालिका टिप्पर चालकांची किमान वेतन टेंडर प्रक्रिया गेले सहा महिन्यांपासून सुरु आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन एक महिना उलटला तरी वर्क ऑर्डर निघालेली नाही. वर्क ऑर्डर त्वरित काढा अन्यथा गुरुवार पासून साखळी उपोषणाचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.


टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी वर्क ऑर्डर थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. या झारितल्या शुक्राचाऱ्यांनी कितीही प्रयत्न केला तरी किमान वेतनचा लढा सूरूच राहील. सर्व तांत्रिक प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे, त्यामुळे वर्क ऑर्डर जाहीर करण्यास अडचण नाही. त्यामुळे प्रशासकांनी यास त्वरित मंजुरी द्यावी, अन्यथा गुरुवार पासून साखळी उपोषण सुरु करणार असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.


कोल्हापूर ऑनलाईन वर ४९९/- ३० दिवस जाहिरात

संपर्क ९३२६२६२३२३


यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, अजिंक्य जाधव, जयसिंग चौगुले, मयूर भोसले, संजय नलवडे, अमरसिंह दळवी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.