छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौसैनिकांच्या गणवेशावर लावण्याचा निर्णयाचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने जल्लोषी स्वागत

 छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौसैनिकांच्या गणवेशावर लावण्याचा निर्णयाचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने जल्लोषी स्वागत





कोल्हापूर दि.५ प्रमोद पाटील

काल दिनांक ४ डिसेंबर रोजी ‘नौसेना दिनाच्या’ निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले त्याचबरोबर नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावली जाणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 


भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम, भारत माता कि जय अशा घोषणांचा जयघोष करून छ.शिवाजी चौक दणाणून सोडला, पायमल वसाहत मधील बबन मोकाशी यांच्या मर्दानी खेळाच्या आखाड्यातील मुला-मुलींनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी वातावरण शिवमय झाले होते. यानंतर पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून, पुष्पहार अर्पण केला. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांना आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या इतिहासाची उदाहरणे देत मोदिजींच्या निर्णयाचे स्वागत केले. 



याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेली सत्तर वर्षे आपल्या सशस्त्र सेनांचे दिवस दिल्लीतील एखाद्या लॉनवर साजरे होत असत. गेल्या सत्तर वर्षात प्रथमच देशाचे पंतप्रधान आपल्या नौसेना दिवस साजरा करण्यासाठी सिंधुदर्गावर आले होते. महाराष्ट्राच्या भूमीत झालेल्या या कार्यक्रमातील हा निर्णय महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मध्ययुगाच्या पूर्ण गुलामगिरीच्या इतिहासात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याच्याकडे आरमार त्यांची समुद्रावर सत्ता, त्या राज्याचे समुद्रकिनारे बळकट, आणि अंतिमतः जगाच्या व्यापाराचे दरवाजे त्या राज्याचे खुले होतात असा सर्व विचार करून शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले. त्या अर्थाने शिवाजी महाराज हे आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक ठरतात. गेले सत्तर वर्षे स्वतंत्र भारताची नौसेना गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या ध्वजाला वंदन करत होती. मोदी सरकारने हे एक गुलामगिरीचे प्रतीक नष्ट करून देशवासियांना आणि नौसेनेलाही अभिमान वाटेल असा हा बदल करून दाखवला. 


कोल्हापूर ऑनलाईन वर ४९९/-* ३० दिवस जाहिरात

संपर्क ९३२६२६२३२३


याप्रसंगी भाजपा प्रवक्ते अशोक देसाई म्हणाले, आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव करणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातले पहिले सरकार आहे. त्याचबरोबर मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले. 


याप्रसंगी बोलताना महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम म्हणाल्या, कालच्या नौसेनेच्या प्रात्यक्षिकांमध्ये एका युद्धनौकेचे नेतृत्व एका महिलेच्या हातात होते. मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी जितक्या गोष्टी केल्या आहेत तितक्या गेल्या सत्तर वर्षात कोणी केल्या नसतील आणि मोदीजी आपल्या भाषणात म्हणाले देखील की, नौसेनेमध्ये सुद्धा नारी शक्तीला प्रोत्साहन देणे ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.  


छत्रपती शिवाजी चौकातील या कार्यक्रमाचे नियोजन बंडादादा साळोखे, अवधूत भाट्ये, सुनील पाटील, अमेय भालकर यांनी पाहिले.


यावेळी सरचिटणीस डॉक्टर सदानंद राजवर्धन, उपाध्यक्ष गणेश देसाई, आप्पा लाड, चिटणीस भरत काळे, अतुल चव्हाण, रोहित पोवार, जयराज निंबाळकर, दिग्विजय कालेकर, अमर साठे, राजसिंह शेळके, संग्रामसिंह निकम, सचिन तोडकर, भगवान काटे, मंडल अध्यक्ष प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, प्रकाश सरनाईक, सुधीर देसाई, गिरीश साळोखे, संतोष माळी, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, परवेज पठाण, सौ. तांबे, अनुप देसाई, सयाजी आळवेकर, अमोल पालोजी, विजय गायकवाड, प्रकाश घाटगे, चंद्रकांत घाटगे, विश्वास जाधव, संग्राम जरग, इक्बाल हकीम, दिलीप मेत्रानी, महेश यादव, योगेश साळोखे, प्रवीणचंद्र शिंदे, निरंजन शिंदे, मनोज इंगळे, अभिजीत आमटे, अनिल कोळेकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, शाहरुख गढवाले, विश्वजीत पवार, तानाजी निकम, कार्तिक देशपांडे, राजेंद्र वडगावकर, सुमित पारखे, दिनेश पसारे, छाया साळुंखे, शुभांगी चितारे, छाया ननवरे, प्रणोती पाटील, अश्विनी वास्कर, सौ. पालकर, संगीता पोळ, अपेक्षा नागोसे, स्मिता गायकवाड, तेजस्विनी पार्टे, ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.