फर्टीमीन व फर्टीमीन प्लस” नवीन ५ किलो पॅकिंग व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचा शुभारंभ

 "फर्टीमीन व फर्टीमीन प्लस” नवीन ५ किलो पॅकिंग व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचा शुभारंभ




कोल्‍हापूर ता.२८ प्रतिनिधी

 महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा ५ किलो पॅकिंग मधील विक्री शुभारंभ व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचे उद्घाटन माजी गृह राज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थित संपन्‍न झाले.




          यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक, बाबासाहेब चौगले, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, अमरसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, आर.के.मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.