प्रशासनाच्या आश्वासनानंतर टिपर चालकांचे ठिय्या आंदोलन स्थगित : उपसमितीच्या बैठकीत टेंडर मंजूर करण्याचे ग्वाही


प्रशासनाच्या आश्वासनानंतर टिपर चालकांचे ठिय्या आंदोलन स्थगित : उपसमितीच्या बैठकीत टेंडर मंजूर करण्याचे ग्वाही 


कोल्हापूर २७ प्रतिनिधी 

शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिपर चालकांना किमान वेतन मिळावे यासाठी आम आदमी पार्टीच्या नेतृवात गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरु आहे. किमान वेतन प्रमाणे टेंडर निघावे यासाठी एप्रिल महिन्यात टिपर चालकांनी काम बंद आंदोलन केले होते. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने संप मिटून टेंडर प्रकाशित झाले होते. टेंडर प्रकाशित होऊन सहा महिने उलटले आहेत. आतापर्यंत टेक्निकल बिड, कमर्शीयल बिड उघडून उपसमितीकडे निर्णयासाठी टेंडर जाणे अपेक्षित होते. परंतु आप ने बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर टेक्निकल बिड उघडण्यात आले होते.


टेंडर प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याचा आरोप करत टिपर चालकांनी बेमुदत आंदोलन सुरु केले. कमर्शीयल बिड उघडून उपसमितीची बैठक तातडीने घ्यावी जेणेकरून टेंडर वर निर्णय होऊन पुढील महिन्यापासून किमान वेतन मिळू शकेल यासाठी हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले गेले. येत्या सोमवार पर्यंत निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला होता. यावर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासोबत आप शिष्टमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर प्रशासनाने कमर्शीयल बिड उघडले. पात्र कंपन्यांना दर निश्चितीसाठी बोलवू, बुधवारच्या उपसमिती बैठकीत मंजुरी देऊन प्रशासकांच्या समोर प्रकरण ठेऊ असे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.


आंदोलनाचे नियोजन संघटक सूरज सुर्वे व सचिव अभिजित कांबळे यांनी केले.


यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, संजय साळोखे, दुष्यंत माने, विजय हेगडे, नाझील शेख, समीर लतीफ, संजय राऊत, रणजित बुचडे, कुमार साठे, युवराज कवाळे, जोतिबा पाटील, योगेश आवळे, रुपेश घार्गे, अभिजित कात्रट यासह टिपर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.