यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम तर्फे नीता अंबानी ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित

 यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम तर्फे नीता अंबानी ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित


 


मुंबई 

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीत यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) तर्फे आयोजित कार्यक्रमात फोरमचे अध्यक्ष जॉन चेंबर्स यांच्या हस्ते नीता अंबानी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी आणि बिजनेस लीडर्सया कार्यक्रमाला उपस्थित होते.


 


नीता अंबानी म्हणाल्या, “हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप सन्मान वाटतो. मी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रतिनिधित्व करत आहे, ज्याद्वारे आम्ही 7 कोटी 10 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' रूढ होण्याच्या खूप आधीपासून, रिलायन्स 'कॉर्पोरेट नैतिक जबाबदारी' पार पाडत आहे."


 


यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की नीता अंबानी सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी असलेल्या व्यावसायिक नेत्या आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने शिक्षण, कला, क्रीडा आणि आरोग्य सेवेद्वारे लाखो भारतीयांच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे. त्यांचे कार्य विशेषतः महिला सक्षमीकरण आणि मुलांच्या हितासाठी आहे. लिंगभेद दूर करण्यात आणि भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.


 


नीता एम. अंबानी यांच्या कला आणि संस्कृतीतील महत्त्वपूर्ण योगदानाची नुकतीच ओळख झाली जेव्हा त्यांची न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या बोर्डावर मानद विश्वस्त म्हणून निवड झाली. गेल्या वर्षी मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) उघडण्यात आले, ज्याचे खूप कौतुक झाले. रिलायन्स फाऊंडेशनने गरिबांसाठीही उत्कृष्ट काम केले आहे. फाऊंडेशनने भारतातील युवा खेळाडूंना तळागाळात तसेच जागतिक स्तरावर चमक दाखवण्यास मदत केली आहे.


 


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून, नीता एम. अंबानी यांनी भारतीय शिष्टमंडळाचे यशस्वी नेतृत्व केले, यामुळे चार दशकांनंतर भारतात 141 व्या IOC सत्राचे आयोजन करण्याचा अधिकार मिळवला. ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबईत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यामुळे 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत.


 


नीता अंबानी यांना पुरस्काराबद्दल टिप्पणी करताना, USISPF चे अध्यक्ष जॉन चेंबर्स म्हणाले: “जीवनात यशस्वी झालेल्या लोकांसाठी इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत करणे खूप महत्वाचे आहे. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे नीता एम. अंबानी ज्या परोपकाराचे मूर्तिमंत उदाहरण आहेत आणि त्यांनी रिलायन्स फाऊंडेशनमध्ये कला, क्रीडा, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात अनुकरणीय कार्य केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.