गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातील कार्यक्रमांना परवानगी नाकारली_



गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातील कार्यक्रमांना परवानगी नाकारली



कोल्हापूर २० प्रतिनिधी 

गौतमी पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रात तुफान गाजतंय. गौतमीच्या बऱ्याच कार्यक्रमांना लोकांची हुल्लडबाजी झाल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी गौतमीचे कोल्हापुरात होऊ घातलेले दोन कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोरंजन विभागाने देखील ही परवानगी नाकारल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी ही माहिती दिली आहे.


गौतमीचे कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरण ठरलेलं आहे. गणेशोत्सवात सर्व पोलीस व्यवस्था बंदोबस्तात असल्याने शहरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांनी तसेच जिल्हा स्तरीय मनोरंजन विभागाने गौतमीचे कार्यक्रम रद्द केले आहेत

गौतमीचे 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापुरातील नंदगाव आणि राशिवडे येथे होणार होता. मात्र पोलिसांनी दोन्ही कार्यक्रमांना परवानगी न दिल्याने आयोजकांनी कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले आहे. ”या कार्यक्रमाला तत्काळ सुरक्षा देणं आता शक्य नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलीस विभाग व्यस्त आहे. तसेच या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहता इथे सतत हुल्लडबाजी होत असते”, असे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.