‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ मालिकेतून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एका IAS अधिकारी स्त्रीची प्रेरणादायक आणि वेधक कहाणी

 ‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ मालिकेतून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एका IAS अधिकारी स्त्रीची प्रेरणादायक आणि वेधक कहाणी



कोल्हापूर, ता. 22 प्रतिनिधी

- वर्तमान साचेबंदपणाला शह देऊन दमदार व्यक्तिरेखा असलेली वेधक कथानके सादर करण्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी नेहमीच आघाडीवर असते. आता ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांसमक्ष घेऊन येत आहे, काव्या या प्रेरणादायक व्यक्तिरेखेची आकर्षक कहाणी. काव्या एक IAS अधिकारी आहे आणि देशाची सेवा करून सामान्य माणसाला न्याय देण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.


 या मालिकेत टेलिव्हिजन अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान शीर्षक भूमिका करत आहे. काव्या एक दृढनिश्चयी आणि ध्येयाने झपाटलेली स्त्री आहे, जिने IAS बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघड निर्णय घेतले आहेत. तिच्यासोबत या मालिकेत आहे, मिश्कत वर्मा, जो आदिराज प्रधानची भूमिका साकारत आहे. आदिराज स्त्री-शक्तीचा भोक्ता आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी त्याला मनापासून आदर आहे. सिव्हिल सर्व्हिस अकादमीतमध्ये त्याची ओळख काव्याशी होते. काव्याचा वाग्दत्त वर शुभम साकारला आहे, अनुज सुलेरे या कलाकाराने. काव्याविषयी आणि तिच्या IAS बनण्याच्या महत्त्वाकांक्षेविषयी आस्था असूनदेखील तो तिला त्या दोघांचे नाते आणि कारकीर्द यापैकी एकाची निवड करायला सांगतो. या पेचप्रसंगात काव्या आपल्या IAS अधिकारी बनण्याच्या ध्येयावर अढळ राहते आणि आपल्या महत्त्वाकांक्षेचा बळी न देता साखरपुडा तोडण्याचे धाडस दाखवते.


‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ सुरू होत आहे, 25 सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवार ही मालिका प्रसारित करण्यात येईल रात्री 7.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!


सुम्बुल तौकीर खान, अभिनेत्री : “मी काव्या या व्यक्तिरेखेकडे आकर्षित झाले, कारण ती एक अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिरेखा आहे. काव्याच्या जीवनाचे एकच ध्येय आहे – IAS अधिकारी बनणे. हे ध्येयच तिला सर्व आव्हानांवर मात करण्याचे बळ देते. काव्या केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर अशा अनेक महिलांचे ती प्रतिनिधित्व करते, ज्यांना त्यांच्या निर्धाराची वारंवार कसोटी द्यावी लागते. पण आपल्या अढळ निर्धारामुळे त्या जीवनात कर्तृत्व गाजवतात.”


 मिशकत वर्मा, अभिनेता : “आदिराज ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी फारच उत्सुक आहे, कारण ही अशी व्यक्तिरेखा आहे, जी भारतीय टेलिव्हिजनवर झळकलेल्या पुरुष व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळी आहे. तो ‘आळशी पण प्रतिभावान’ आहे आणि त्याची मोहकता त्याच्या हुशारीइतकीच लक्षणीय आहे. व्यक्तिशः मला वाटते की, महिलांना त्यांच्या योग्यतेनुसार श्रेय मिळाले पाहिजे, त्यात भेदभाव होता कामा नये. आदिराज या व्यक्तिरेखेत देखील हीच भावना आहे.”


 अनुज सुलेरे, अभिनेता : नारीशक्ती दुर्दम्य आहे. आपल्या मनाजोगे जीवन जगण्यासाठी किंवा लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांना पुरुषाची गरज नाही. त्यांना एक व्यक्ती म्हणून मान मिळावा हीच अपेक्षा असते. आणि मला वाटते की, पुरुष या नात्याने आपण त्यांना आणि त्यांच्या निवडीला मान देऊन त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. बाकी सर्व काही करण्यासाठी त्या समर्थ असतातच! या मालिकेत शुभम आणि काव्या यांच्या नात्यातील गुंतागुंत, त्यांच्या संमिश्र भावना, त्यांची व्यक्तिगत आणि व्यावसायिक ध्येये आणि ती साध्य करण्यासाठीचा प्रवास दाखवला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.