कोल्हापूर बंदच्या वेळी दगडफेक करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा - कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना निवेदन

 कोल्हापूर बंदच्या वेळी दगडफेक करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा - कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना निवेदन 



कोल्हापूर 13 न्यूज डेस्क

  ७ जून २०२३ या दिवशी कोल्हापूर येथे नागरिकांनी पुकारलेल्या बंदच्या संदर्भात समाजमाध्यमांतून काही गंभीर चित्रफिती समोर येत आहेत. यात विशिष्ट समुदायातील समाजकंटक सार्वजनिक किठाणी दगड फेकतांना दिसत आहे. काही प्रत्यक्षदर्शीच्या मतानुसार अकबर मोहल्ला, तसेच काळा मशिद ते सोन्या मारुति चौक या भागात पेट्रोल बाँब फेकण्यात आले. यामुळे कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. दुर्दैवाने या समाजकंटकांवर आजपर्यंत कारवाई झालेली दिसत नाही. या निवेदनासमवेत आम्ही काही ‘व्हिडिओ’ जोडत आहोत. तरी या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले. या प्रसंगी सकल हिंदू समाजाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.