आप चं अनोखं आंदोलन, शाळांचा दर्जा सुधारण्याची मागणी

 आप चं अनोखं आंदोलन, शाळांचा दर्जा सुधारण्याची मागणी






शाळांच्या दुरावस्थेचा अहवाल वाजत गाजत महापालिकेला सादर


कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क

महापालिका शाळांची परिस्तिथी सुधारावी यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने लावून धरली गेली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अखेर आप ने सर्व महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्व्हे केला होता.


या सर्व्हेचा अहवाल आप ने महापालिकेवर वाजत गाजत जात सादर केला गेला. आपच्या कार्यकर्त्यांनी अहवालाची प्रत पालखीमध्ये सजवून हलगीच्या ठेक्यावर शिवाजी चौक ते महापालिका चौक असे चालत जाऊन महापालिका अधिकाऱ्यांना अहवाल दिला. 


महापालिकेच्या 58 शाळांच्या इमारतीची परिस्थिती, शाळेच्या परिसर व स्वच्छतागृहांची स्वच्छता, मैदानाची अवस्था, अतिक्रमण आदी मुद्दे या सर्व्हेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.


25% इमारती निकृष्ट असून 9% टक्के इमारती पडण्याच्या स्थितीत आहेत.


महापालिका शाळांमधील 78% स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. 


पालिकेच्या 65% शाळांमधील पिण्याची पाणी पिण्यायोग्य नाही. साठलेले शेवाळ, गाळ, बंद पडलेले फिल्टर यामुळे विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. 


53% शाळा ओपन ओपन बार झाल्याचे धक्कादायक बाब या सर्व्हेमधून समोर आले आहे.


39% शाळांना अतिक्रमणांनी ग्रासले आहे. ओपन जिम, मुलांची खेळणी तुटले आहेत.


आप चे शहर सचिव अभिजित कांबळे आणि विभाग प्रमुख समीर लतीफ यांनी 57 शाळा, 1 हायस्कुल 1 महाविद्यालयाला भेटी देऊन हा सर्व्हे पूर्ण केला.


सर्व्हेमध्ये आढळून आलेल्या बाबींवर महापालिकेवर वाजत गाजत जाऊन प्रशासनाला हा अहवाल आम्ही भेट दिला आहे. शाळेतील अस्वच्छ स्वच्छतागृहे, अतिक्रमणे, पिण्याचे पाण्याची गैरसोय, ओपन बार या सारख्या गंभीर परिस्थिमुळे महापालिका शाळांची दुरावस्था झाली आहे. या अहवालामधील निष्कर्षांवर कार्यवाही करण्यासाठी आप सातत्याने पाठपुरावा करून शाळा दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आप चे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.


अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी अहवाल स्वीकारला. तसेच अहवाल दिल्याबद्दल गुलाब पुष्प देऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.


यावेळी निलेश रेडेकर, सुदर्शन कदम, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, संजय साळोखे, अमरजा पाटील, मोईन मोकाशी, दुष्यन्त माने, इस्थेर कांबळे, पूजा अडदांडे, आदम शेख, डॉ. कुमाजी पाटील, राकेश गायकवाड, विजय हेगडे, सदाशिव कोकितकर, रवींद्र राऊत, संजय नलवडे, उमेश वडर, प्रथमेश सूर्यवंशी, राजेश खांडके, लखन काझी, विलास पंदारे, विजय दिवाण, दिलीप कोळी, जावेद पठाण, रणजित बुचडे, कुमार साठे, प्रथमेश कदम, दिग्विजय चिले, संदेश संकपाळ, योगेश बर्गे, जयसिंग चौगुले, सतीश गायकवाड, वसंत पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.