कोल्हापूर जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि.16 जुलै ला कोल्हापूरात

 कोल्हापूर जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि.16 जुलै ला कोल्हापूरात



 कोल्हापूर १२ न्यूज डेस्क

  कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत.रविवारी सकाळी साडेदहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. प्रत्येक खेळाडूस  पंधरा मिनिटे व प्रत्येक चालीस दहा सेकंद वाढीव वेळ देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्धिबळपटूना च भाग घेता येईल.

या निवड स्पर्धेतून चार बुद्धिबळपटूंची  निवड 20 ते 23 जुलै 2023 दरम्यान जळगाव येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य  खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.

 विजेत्या पहिल्या चार क्रमांकांना अनुक्रमे रु.1000/-, रु.700/- , रु.500/- व रु.300/-  रोख बक्षीस व चषक/मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे.

त्याशिवाय निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये व स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येकास  टी शर्टस् संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त रुपये 100 प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शनिवार दिनांक 15 जुलै ला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.


  1) श्री. भरत चौगुले -  7620067251.

 2) मनीष मारुलकर - 9922965173

3) उत्कर्ष लोमटे - 9923058149

4) प्रितम घोडके  - 8208650388

5) रोहित पोळ - 9657333926

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.