आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 सोमवार, १६ मार्च २०२६ – राशिभविष्य




तारीख: फाल्गुन कृष्ण द्वादशी
ऋतू: शिशिर
शके: १९४७ | संवत: २०८२ | संवत्सर: विश्वावसु

राहू काळ: सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र: धनिष्ठा
चंद्र राशी: मकर (संध्याकाळी ६.१४ नंतर कुंभ)
आजचा विशेष योग: चंद्र केंद्र हर्षल योग
विशेष: सोमप्रदोष
सूचना: सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे.


१६ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे तुमची कल्पनाशक्ती प्रखर असते. व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि प्रभावी असल्याने लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतात. तुमची बुद्धी चपळ असून नवीन कल्पना सुचविण्याची क्षमता तुमच्यात मोठ्या प्रमाणात असते.

तुमचा स्वभाव भावनाप्रधान असला तरी इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता उत्कृष्ट असते. त्यामुळे लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. नेतृत्वगुण आणि नियोजन क्षमता तुमच्यात चांगली असते.

प्रवास, संशोधन आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड तुम्हाला असते. आयुष्यात अचानक बदल घडत राहतात—कधी मोठे यश तर कधी काही अडचणी. मात्र संकटांना सामोरे जाण्याची ताकद तुमच्यात असते.

तुमची विचारसरणी स्वतंत्र असते. रूढी-परंपरा आणि बंधने तुम्हाला फारशी आवडत नाहीत. आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक आणि सामाजिक प्रगती मिळण्याची शक्यता जास्त असते.

सूचना: हट्टीपणा आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास उत्तम यश मिळते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असता.

योग्य क्षेत्रे:
संशोधन, अभियांत्रिकी, संगणक, बँकिंग, संगीत, कला, ज्योतिष, मानसशास्त्र, शिक्षण, प्रशासन आणि उद्योग-व्यवसाय.

शुभ दिवस: सोमवार, गुरुवार, शनिवार
शुभ रंग: निळा, पांढरा, हिरवा
शुभ रत्न: मोती, पाचू, नीलम (रत्ने घेण्यापूर्वी कुंडली तपासावी)


राशिभविष्य

मेष:
आज कामात वेग येईल. महत्वाची कामे सकाळीच पूर्ण करा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ:
आजचा दिवस आनंददायी आहे. घरात शुभ चर्चा होतील. प्रवासाचे योग संभवतात. नवीन योजना आखाल.

मिथुन:
तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. बैठकीत तुमचा सल्ला महत्वाचा ठरेल. आर्थिक लाभ मिळू शकतो.

कर्क:
कामाच्या ठिकाणी व्यस्तता वाढेल. जबाबदाऱ्या वाढतील पण तुमच्या प्रयत्नांमुळे चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांची कृपा राहील.

सिंह:
आज तुमचे व्यक्तिमत्त्व विशेष उठून दिसेल. कामाचे कौतुक होईल. समाजात मान-सन्मान मिळेल.

कन्या:
संशोधन, अभ्यास आणि नियोजनात प्रगती होईल. महत्वाचे निर्णय घेण्यास योग्य वेळ. चिकाटीमुळे यश मिळेल.

तुळ:
काही खर्च संभवतात. घरासाठी नवीन वस्तू खरेदी होऊ शकते. मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल.

वृश्चिक:
आत्मविश्वास वाढेल. महत्वाचे काम यशस्वी होईल. सरकारी कामात प्रगती होण्याची शक्यता.

धनु:
नवीन काम सुरू करण्याची इच्छा होईल. व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. प्रवासाचे योग संभवतात.

मकर:
चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावनिकता वाढेल. कामात व्यस्तता राहील. सकाळचा वेळ विशेष अनुकूल आहे.

कुंभ:
संध्याकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करेल. मन प्रसन्न राहील. नवीन कल्पना सुचतील. मित्रांचा सहवास लाभेल.

मीन:
थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. मात्र कामात लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील. धार्मिक कार्यात मन लागेल.


मार्गदर्शन व कुंडली परीक्षणासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.