विशाळगडावर बेकायदेशीररित्या भरणाऱ्या ऊरसावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी यासाठी हिंदू एकता आंदोलन यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर ०४ प्रतिनिधी
विशाळगडावर बेकायदेशीररित्या भरणाऱ्या ऊरसावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन आज हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या उरुसाची पार्श्वभूमी
विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिकरेहान याचे थडगे होते. त्याच्या भक्तांनी त्या थडग्याचे रूपांतर तीन मजली आरसीसी दर्ज्यामध्ये हजरत पीर मलिकरेहान या नावाने केलेला आहे. या बेकायदेशीर दर्गात अनेक वर्ष बकरी ईदच्या दरम्यान तीन दिवस मोठ्या प्रमाणात ऊरस भरवला जातो. या ऊरसामध्ये हजारो कोंबड्या बोकडांचा बळी देऊन हजारो लिटर दारू फस्त केली जाते. गडावर जुगार खेळला जातो. या सर्व गोष्टी ज्या नरवीर बाजीप्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले व रक्त सांडले त्या बलिदानाचा अपमान करणारा म्हणजे दरवर्षी भरणारा विशाळगडावरील ऊरस.
या ऊरसाविरोधात महाराष्ट्रातल्या शिवभक्तांच्या मध्ये प्रचंड चिड आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आम्ही मागणी केल्यानंतर त्या भरणाऱ्या ऊरसावर बंदी घातली होती. विशाळगडावर बोकड व कोंबडी यांची कत्तल करायला, मौस शिजवायला, व दारू प्राशन करायला आमच्या मागणीनंतर सरकारने बंदी घातली आहे.
तरी यंदाच्या वर्षी बकरी ईद दरम्यान रोजी पुन्हा मलिकरेहानचे भक्त ऊरस भरवण्याची शक्यता आहे. तरी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्यावर दर्गाह हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान या नावाने बेकायदेशीर दर्गा उभारला होता. त्या दर्ज्यामध्ये अशाच पद्धतीने अनेक वर्षे ऊरस भरत होता.
परंतु आम्ही आंदोलन करून सातारा जिल्हा प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ऊरसावर कायमची बंदी घातली होती. त्याच पद्धतीन मुस्लिम सरदार मलिकरेहान च्या नावान भरणाऱ्या ऊरसावर सुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कामस्वरूपी बंदी घालावी.
विशाळगडावर एकूण 158 अतिक्रमणे होती. त्यापैकी 94 अतिक्रमणे आमच्या मागणी नंतर काढण्यात आली. उरलेली 64 अतिक्रमणांपैकी 45 जणांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे. दिनांक 31 मे 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे 14 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. ज्या 45 जणांनी न्यायालय जाऊन स्थगिती घेतलेली आहे त्यांच्या विरोधात सरकारने नामवंत वकिलांची फौज उभा करून दिलेली स्थिती उठवून उर्वरित सर्व अतिक्रमणे बुलडोझर लावून जमीनदोस्त करावीत अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपणाकडे करीत आहोत. विशाळगडावर मुस्लिम सरदार मलिकरेहानच्या नावाने बांधलेला बेकायदेशीर दर्गा प्रतापगडाच्या पायथ्याशी मुस्लिम सरदार अफजलखानाच्या नावाने बांधलेला बेकायदेशीर दर्गा जसा सरकारने बुलडोजर लावून जमीनदोस्त केला त्याच पद्धतीने मलिकेरेहानच्या नावान विशाळगडावर बांधलेला तीन मजली आरसीसी बेकायदेशीर दर्गा बुलडोझर लावून जमीन दोस्त करावा. व संपूर्ण विशाळगड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा अशी ही मागणी हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्त आंदोलन यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मा. नितीन शिंदे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, गणेश नारायणकर, संजय सोडोलीकर, प्रतीक डिसले, सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, दत्तात्रय भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, प्रसाद रिसवडे, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, हिंदुराव शेळके, मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, अरविंद येतनाले, अरुण वाघमोडे, विलास मोहिते. आदी उपस्थित होते.



