कोल्हापुरात बिंदू चौकातून दिव्यांग दिन रॅलीचा प्रारंभ

 कोल्हापुरात बिंदू चौकातून दिव्यांग दिन रॅलीचा प्रारंभ

         


पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखविला हिरवा झेंडा

            

कोल्हापूर, दि. ३ प्रमोद पाटील 

आज रविवार दि. ३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग सांस्कृतिक सोहळा - २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात सकाळी आठ वाजता दिव्यांग दिन रॅलीला महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. 


फक्त 499/- मध्ये करा 30 दिवस जाहिरात
      जाहिरातीसाठी संपर्क               9326262323 


कोल्हापुरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झालेली ही रॅली बिंदू चौकातून अयोध्या टाकीजमार्गे दसरा चौकापर्यंत पोहोचली. कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता साधना कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.