भारतीय दलित महासंघातर्फे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

 भारतीय दलित महासंघातर्फे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा



कोल्हापूर २६ प्रतिनिधी 

भारतीय दलित महासंघातर्फे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला

भारतीय संविधान स्वीकृत दिन भारतीय दलित महासंघातर्फे साजरा करण्यात आला. बिंदू चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांतआप्पा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महासंघाचे प्रवक्ते अमोल कुरणे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे  सामूहिक वाचन केले. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळे, जिल्हा संपर्कप्रमुख दयानंद कांबळे, शाहूवाडी अध्यक्ष आकाश कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष सागर घोलप, आकाश गायकवाड, दत्तात्रय ठाणेकर, दाजी कांबळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.