डॉ.विशाल सिन्हा शिवसेना पश्चिम महाराष्ट्र "श्री" चा मानकरी

 डॉ.विशाल सिन्हा शिवसेना पश्चिम महाराष्ट्र "श्री" चा मानकरी



पिळदार शरीराचे १०० हून अधिक स्पर्धक; कोल्हापुरात रंगला पश्चिम महाराष्ट्र श्री चा थरार


कोल्हापूर दि.२६ प्रमोद पाटील 

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना विभाग मंगळवार पेठ यांचे वतीने "पश्चिम महाराष्ट्र श्री" बॉडी बिल्डींग स्पर्धेचे मिरजकर तिकटी चौकात आयोजन करण्यात आले होते. पिळदार शरीराच्या १०० हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि प्रेक्षकांची दाद यामुळे तब्बल चार तास स्पर्धा चालल्या. स्पर्धकांनी प्रेक्षक वर्गात जावून आपल्या पिळदार शरीराच्या पोझेस दिल्या, यास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सर्वामध्ये सरस ठरत चंदगडच्या डॉ.विशाल सिन्हा पश्चिम महाराष्ट्र "श्री" चा मानकरी ठरला. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स व कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या मान्यतेने या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेला गुरुवर्य बिभीषण पाटील सर यांनी प्रमुख उपस्थिती लावली.


            सायंकाळी कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा अध्यक्ष श्री.ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते मंगळवार पेठ परिसरातील प्रमुख मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ५ गटामध्ये खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत पुणे, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातील १०० स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये सर्वांवर बाजी मारत कोल्हापूरच्या चंदगड येथील डॉ.विशाल सिन्हा पश्चिम महाराष्ट्र "श्री" चा मानकरी ठरला. बेस्ट म्युझिक पोझर म्हणून अक्षय दांडेकर (कोल्हापूर), बेस्ट इंम्प्रूड म्हणून विशाल सुरवसे (सोलापूर), बेस्ट मस्क्युलर मनोहर लाड (सांगली) यांची निवड करण्यात आली. विजेत्या डॉ.विशाल सिन्हा याला "पश्चिम महाराष्ट्र श्री" ची मानाचे सन्मानचिन्ह, मेडल आणि रोख रु.१० हजार बक्षीस देवून गौरविण्यात आले. तर विशेष प्राविण्य मिळविलेल्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना रोख रु.३ हजार आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यासह पाचही गटातील प्रथम पाच स्पर्धकांना अनुक्रमे रोख प्रथम क्रमांक रु.५ हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रोख रु.४ हजार व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रोख रु. ३ हजार व सन्मानचिन्ह, चौथा क्रमांक रोख रु.२ हजार व सन्मानचिन्ह, पाचवा क्रमांक रु.१ हजार व सन्मानचिन्ह बक्षीस देवून गौरविण्यात आले.


स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे ६० किलो - किरण पोवार, शुभम मोरे, सुजल परीट, ओमकार लादवे, सचिन कांबळे, गट ६० ते ६५ किलो - अक्षय दांडेकर, सचिन पालकर, संतोष पाटील, प्रशांत मोरे, संजय हडपद, गट ६५ ते ७० किलो - मनोहर लाड, ओंकार पाटील, यश खोत, अश्विन रोटे, स्वप्नील पाटील, गट ७० ते ७५ किलो - विशाल सिन्हा, ऋषिकेश पाटील, सयाजी गायकवाड, सिद्धांत सोनाळकर, अभिषेक माजगांवकर, गट ७५ वरील खुला - विशाल सुरवसे, श्रीधर माने, आकाश कवडे, विनायक रेडेकर, उत्कर्ष माळगे असा आहे. स्पर्धेकरिता पंच म्हणून गुरुवर्य बिभीषण पाटील, रामकृष्ण चितळे, विजय मोरे, रविंद्र आरते, प्रशांत पाटील, सुहास व्हटकर, विवेक रणवरे, राहुल परीट, प्रफुल्ल हळदणकर, सचिन चांदेकर, किशोर सोनसूरकर यांनी काम पाहिले.


            दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी स्पर्धेस भेट देवून सहभागी खेळाडूंचा प्रोत्साहन दिले. श्री.राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते गुरुवर्य बिभीषण पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यासह मंगळवार पेठ परिसरातील शेकडो जेष्ठ शिवसैनिकाचा विशेष गौरव करण्यात आला. शिवसेना विभाग मंगळवार पेठ यांचे वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.


            यावेळी संयोजन समितीचे  नंदू सुतार, अक्षय पोवार डम्या, कुणाल शिंदे, राजू पाटील, सचिन पाटील, प्रशांत जाधव, रणजीत मंडलिक, श्रीकांत मंडलिक, राहुल चव्हाण, गणेश रांगणेकर, संकेत गवळी, विनय मंडलिक, रणजीत सासणे आदी मंगळवार पेठ परिसरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.             



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.