कोल्हापूर जिल्हा जलद, अतिजलद व अमॅच्युर (2300 गुणांकनाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दि.2 डिसेंबरला कोल्हापूरात

 

कोल्हापूर जिल्हा जलद, अतिजलद व अमॅच्युर (2300 गुणांकनाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दि.2 डिसेंबरला कोल्हापूरात


कोल्हापूर २९ 

 चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने शनिवार दि.2 डिसेंबर रोजी जलद,अतिजलद व अमॅच्युर (2300 गुणांकनाखालील) कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा  जयलक्ष्मी संस्कृतिक भवन, नागाळा पार्क,कोल्हापूर  येथे घेण्यात येणार आहे.

  या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत.शनिवारी सकाळी बारा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना भाग घेता येईल.

या निवड स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य जलद व अतिजलद निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी चार व महाराष्ट्र राज्य अमॅच्युर (2300 गुणांकनाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी चार बुद्धिबळपटूंची निवड करण्यात येणार आहे. 9 व 10 डिसेंबर ला ठाणे येथे महाराष्ट्र राज्य अमॅच्युर (2300 गुणांकनाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे़ तर 16 व 17 डिसेंबर ला मुंबई येथे महाराष्ट्र राज्य जलद व अतिजलद निवड बुद्धिबळ स्पर्धा होत आहे.

 स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 1) रु.1000/-, 2) रु.600/-, 3)रु. 400/- , रुपयांचे रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

त्याशिवाय निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये व स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येकी एक टी शर्ट बुद्धिबळ संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त रुपये 200/- प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शुक्रवार दिनांक 1 डिसेंबरला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.

1) भरत चौगुले - 7620067251.

2) रोहित पोळ - 9657333926

3)मनीष मारुलकर - 9922965173

4) उत्कर्ष लोमटे - 9923058149

5) प्रितम घोडके - 8208650388



अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नवीन नियमानुसार सर्व स्पर्धकांनी यावर्षीपासून राज्य संघटनेचे वार्षिक रजिस्ट्रेशन फी रु.150 भरणे आवश्यक आहे तरी या वर्षी चे रजिस्ट्रेशन नसलेल्या सर्व बुद्धिबळपटूंनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे या वर्षासाठीचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक द्वारे करावे ही विनंती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.