प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

                                   प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन 



 देवता चित्रपटातील नायक, प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यात मृत्यू, बंद घरात आढळला मृतदेह मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी इथे एका बंद खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून इथे वास्तव्यास होते अशी माहिती समोर येत आहे.तसेच त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. मराठीतील दिग्गज नट काळाच्या पडद्याआड… 

रवींद्र महाजनी यांनी हिंदी मराठी चित्रपटात अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत. त्यांचे देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, हळदी कुंकू असे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. तसेच दिग्दर्शक, निर्माता देखील त्यांनी काम केले. अभिनेत्री रंजना, उषा नाईक व आशा काळे आदींसोबत त्यांनी चित्रपट केले आहे. खेळ कुणाला दैवाचा कळला या प्रसिद्ध गाण्यातील रवींद्र महाजनी कुणीही विसरू शकत नाही.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.