शिगोशी मार्केट परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा 60 वर्षांचा प्रवास सन्मानित - अपार कष्ट, वक्तशीरपणाला मानवंदना

 शिगोशी मार्केट परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा 60 वर्षांचा प्रवास सन्मानित - अपार कष्ट, वक्तशीरपणाला मानवंदना 



कोल्हापूर १९ मिलिंद कुलकर्णी 

ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता वर्षभर सातत्याने घरपोच सेवा देणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे अपार कष्ट आणि वक्तशीरपणा हा समाजातील प्रत्येकाला यशस्वीतेसाठी आदर्शवत व वंदनीय आहे, असे भावस्पर्शी हितगुज पर मनोगत  हृदयस्पर्श परिवाराचे संस्थापक पद्माकर कापसे यांनी काढले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, कोल्हापूर शाखा आणि जायरस ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र विक्री व्यवसायात 60 वर्षे पूर्ण केलेल्या शिंगोशी मार्केट परिसरातील प्रकाश बेनाडे, जयवंत कांबळे आणि श्रीमती सुवर्णा सुगंध पगारे यांचा शाल, श्रीफळ व गुलाब रोप देऊन सन्मान करण्यात आला.

यांचे सत्कार चौंडेश्वरी कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे, हिंदू जनजागृतीच्या डॉ. अश्विनी माळकर, प्रा. तानाजी पाटील, बबीता जाधव व अनिता काळे यांचे हस्ते करण्यात आले 

सर्वाचे स्वागत करताना कार्यक्रमात  राष्ट्रीय सचिव तेजस राऊत यांनी, “वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी भविष्यात व्यापक योजना राबवण्यात येतील,” असे सांगितले. डॉ. अश्विनी माळकर यांनी महिलांनीही या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.


सत्कारमूर्तींच्यावतीने प्रकाश बेनाडे यांनी, “हा सन्मान आमचा उत्साह अधिक वाढवणारा आहे,” असे भावपुर्ण पणे नमूद केले. जायटस अध्यक्ष प्रा. तानाजी पाटील यांनी जैन इंटरनॅशनलच्या व्यासपीठातून मीडियासाठी रचनात्मक प्रकल्प राबवण्याची घोषणा केली.

संयोजक समन्वयक  राजेंद्र मकोटे यांनी अक्षय तृतीया, शिवजयंती आणि बसव जयंती या तिहेरी योगायोगाच्या दिवशी झालेला हा सन्मान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांना भक्कम पाठबळ देण्याबाबत प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमास नंदकुमार मकोटे (संचालक, राजश्री शाहू अर्बन बँक) तसेच माजी नगरसेवक किरण नकाते यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जायटस च्या वैशाली कांबळे, विशाखा शेट्टी राजाराम मटकरे , सागर ठाणेकर  सह वृत्तपत्र विक्रेते राम मकोटे आणि सुनील समडोळीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या वेळी पद्माकर कापसे यांना सांस्कृतिक - नाट्य संगीत  आणि सामाजिक  क्षेत्रातील प्रश्नात मग योगदानाबद्दल  वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अजित ठाणेकर यांच्या हस्ते शाल अर्पण करून देण्यात आले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.