🔮 आजचे राशिभविष्य
शनिवार, ७ मार्च २०२६
फाल्गुन कृष्ण चतुर्थी / पंचमी | विश्वासूनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२
राहुकाळ: सकाळी ९.०० ते १०.३०
नक्षत्र: चित्रा (सकाळी ११.१६ पर्यंत) नंतर स्वाती
आज जन्मलेल्या बाळाची राशी: तूळ
(ध्रुव योग शांती करून घेणे शुभ)
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
♈ मेष
सप्तम स्थानी चंद्र असल्याने जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार किंवा व्यवहार जुळून येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रगती साध्य होईल. मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
♉ वृषभ
षष्ठ स्थानी चंद्र असल्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. कर्ज किंवा आर्थिक व्यवहारातील प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
♊ मिथुन
पंचम स्थानी चंद्र असल्याने सर्जनशीलतेला वाव मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध दृढ होतील. आर्थिक लाभाचे योग संभवतात.
♋ कर्क
चतुर्थ स्थानी चंद्र असल्याने घरगुती आनंद वाढेल. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी विचार पुढे सरकतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवाल.
♌ सिंह
तृतीय स्थानी चंद्र असल्याने धाडस व आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायिक कामात प्रगती होईल.
♍ कन्या
द्वितीय स्थानी चंद्र असल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी होऊ शकते. बोलताना संयम ठेवणे हिताचे.
♎ तुळ
तुमच्याच राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
♏ वृश्चिक
व्यय स्थानी चंद्र असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
♐ धनु
लाभ स्थानी चंद्र असल्याने आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवाराचे सहकार्य मिळेल. नवीन संधी चालून येतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
♑ मकर
दशम स्थानी चंद्र असल्याने नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन प्रकल्प हातात घेण्याची संधी मिळेल.
♒ कुंभ
नवम स्थानी चंद्र असल्याने भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवासातून लाभ मिळतील. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल.
♓ मीन
अष्टम स्थानी चंद्र असल्याने संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. संयमाने वागल्यास अडचणी टाळता येतील.
📌 टीप: नावाप्रमाणेच तुमची राशी असेलच असे नाही. अधिक माहितीसाठी “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
📞 कुंडली परीक्षणासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521



