देशभरातील सृजनशील बारा बलुतेदाराच्या 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ ' चे 31 मार्च पासून पाच दिवस आयोजन


देशभरातील सृजनशील बारा बलुतेदाराच्या 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ ' चे 31 मार्च पासून पाच दिवस आयोजन

देशभरातील दुर्मिळ  कारागिरी एकाच ठिकाणी सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार




देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार


कोल्हापूर २५ प्रमोद पाटील 

श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दि. ३१-३-२०२६ ते ०४-०४-२०२६ या कालावधीत *'सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’* संपन्न होत आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी बोलताना स्वामीजी म्हणाले, “ या कारागीर महाकुंभात  पारंपारिक, हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करतील पण अलीकडच्या काळात लोकांच्या आवडीनुसार व मागणीनुसार कला आणि हस्तकलामधील विविध प्रकार बघायला मिळतात. अश्या कला आणि हस्तकला राज्या-राज्यातून पाहायला मिळतात, कलाकारांचे कसब आणि कौशल्य यातून कलात्मक व आकर्षक अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होते व त्या वस्तूला चांगली मागणी व बाजारपेठ मिळते. इतकेच नाही तर अश्या वैशिष्ट्यपूर्ण कलानिर्मितीला आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील बाजारपेठ मिळते. कारागीर कुंभोत्सवामध्ये अश्या विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे आणि एकूण १७ राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय  स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० हून कलाकार 'सिध्दगिरी कारागीर महाकुंभा’मध्ये सामील होत आहेत. कारागीर कुंभामध्ये असे कलाकार आपल्या कलेचे प्रत्यक्षरित्या  प्रदर्शन करतील. परंतु त्यासोबत अशा कलेतून तयार केलेले वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध करतील. आणि म्हणून या कारागीर महाकुंभाला प्रत्येकाने भेट देणे आवश्यक आहे.”



टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबू काम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला बाहुलींच्या प्रतीकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छ मधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्न पासून वस्तू. मधुवेनी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या इ. हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळतील.

यावेळी प्रस्तावना करताना विवेक सिद्ध म्हणाले, “ तंत्र महाविद्यालय, महाविद्यालय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आय.टी.आय. यात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना या कारागीर महाकुंभासाठी पाचारण केले आहे. जेणेकरून हे युवक-युवती या कालेंचा अध्ययन करतील व या कलांच्यामध्ये आधुनिकतेची जोड कशी देता येईल याचा विचार करतील की जेणेकरून या सर्व कला अविष्कारांना छोटे-छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि म्हणून हा 'सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ एक आगळा वेगळा सोहळा आहे. कोल्हापूर शहरातील स्वतः भेट द्यावी, मित्र, आप्टेष्ट, मित्र नातेवाईक यांना देखील प्रोत्साहित करावे त्यामुळे देशभरातील कारागीरांचा सन्मान होईल व त्यांच्या कलेला गौरव होईल. यासाठी एकत्वं इन्फ्रा कंपनीचा सहभाग आहे.

या पत्रकार परिषदेसाठी सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जी.पी.वढड, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव, विवेक सिद्ध, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, दिवाकर पाटील, पुनीत मुचंडी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.