कोल्हापूरमध्ये महिला दिनानिमित्त सफाई कामगार महिलांचा विशेष सत्कार


कोल्हापूरमध्ये महिला दिनानिमित्त सफाई कामगार महिलांचा विशेष सत्कार

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग ६ व ७ मधील महिला सफाई कामगार महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आणि राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या हस्ते विशेष सत्कार. सनकोट, टोपी आणि ग्लोज वाटप.

कोल्हापूर १० (मिलिंद कुलकर्णी)

जागतिक महिला दिनानिमित्त आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग ६ व प्रभाग ७ मधील महिला सफाई कामगारांचा अनोखा सत्कार करण्यात आला. हा अभिनव उपक्रम आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि नगरसेवक ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून राबविला गेला.

सफाई कामगार महिलांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका सौ. मंगल साळोखे, सौ. दिशा क्षीरसागर, सौ. पूजा क्षीरसागर यांच्या हस्ते सनकोट, टोपी आणि ग्लोज वाटप करण्यात आले.

नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, “प्रभागाची स्वच्छता राखण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही महिला दिवस-रात्र मेहनत करतात. त्यांच्यासाठी हा सत्कार असून भविष्यातही अशा उपक्रमांना चालना दिली जाईल.”

कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ. पवित्रा रांगणेकर, शहर संघटक सौ. पूजाताई भोर, सौ. गौरी माळदकर, सौ. सुनिता भोपळे, सौ. पूजा कामते, तसेच युवतीसेना शहरप्रमुख सौ. नम्रता भोसले, सौ. तेजस्विनी घाडगे, वल्लरी वाले यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व सफाई कामगार महिला उपस्थित होत्या.

हा उपक्रम महिला कामगारांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राबविण्यात आला असून, नागरिकांनी देखील त्यांच्या मेहनतीचा आदर करण्याचे आवाहन करण्यात आले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.