जोतिबा यात्रेसाठी दुचाकींची मोफत सेवा; 100 सेवेकरी 50 तास तत्पर

  जोतिबा यात्रेसाठी दुचाकींची मोफत सेवा; 100 सेवेकरी 50 तास तत्पर 



कोल्हापूर २९ मिलिंद कुलकर्णी 

चैत्र पौर्णिमेनिमित्त जोतिबा डोंगर येथे होणाऱ्या भव्य यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन तर्फे यंदाही विशेष सेवा जाहीर करण्यात आली आहे.

दिनांक 31 मार्च 2026 (मंगळवार) ते 1 एप्रिल 2026 (बुधवार) रात्रीपर्यंत सर्व भाविकांच्या दुचाकी वाहनांसाठी मोफत रिपेअर आणि पंचर सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यात्रेदरम्यान डोंगरावर किंवा घाटामध्ये वाहन नादुरुस्त झाल्यास भाविकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधल्यास त्वरित मदत मिळणार आहे. या उपक्रमासाठी मेकॅनिकल, पंचर, पेट्रोलिंग व स्पेअर पार्ट्ससह तब्बल 100 सेवेकऱ्यांची टीम सलग 50 तास कार्यरत राहणार आहे.

📍 दुरुस्तीची प्रमुख पॉईंट्स:

  • शेवताई मंदिर

  • जुने आंबा झाड

  • एसटी स्टँड

  • यात्री निवास

  • यमाई मंदिर

तसेच घाटामध्ये फिरते 4 पथक सतत गस्त घालत भाविकांना मदत करणार आहेत.

📞 संपर्क क्रमांक:

  • नाना गवळी – 8623936359

  • रवी कांडेकरी – 9422417626

  • बबन सावंत – 7058598322

  • विलास दळवी – 9422686758

  • माधव सावंत – 9421289066

ही सेवा पूर्णपणे निःस्वार्थ भावनेतून राबवली जात असून, यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, तसेच ही माहिती इतर भक्तांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

👉 भक्तांच्या सेवेसाठी सज्ज असलेली ही पुढाकार योजना यात्रेच्या सोयीसुविधांमध्ये महत्त्वाची भर ठरत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.