स्थानिक आणि देशपातळीवर नामवंत कलाकारांनी सजलेला "ये बंधन तो" आज कोल्हापुरात

  स्थानिक आणि देशपातळीवर नामवंत कलाकारांनी सजलेला "ये बंधन तो" आज कोल्हापुरात 




कोल्हापूर २३ प्रमोद पाटील 


स्थानिक तसेच देश पातळीवरचे विविध कलाकारांनी सजलेला ए बंधन तो हा संगीतमय रजनी आज संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात संपन्न होणार आहे. अशी माहिती पूर्णा इव्हेंट च्या सर्वेसर्वा मंगला नियोगी यांनी दिली .

या बहारदार संगीत रजनीत चेन्नई येथील जोसुला शेखर, नाशिक येथील मयंक बोरकर, इंदोर स्थित गायिका शिफा आफताब , शर्वरी जाधव , अरविंद कस्तुरे , निवेदक महेंद्र कुलकर्णी त्याच बरोबर स्थानिक वाद्यवृंद कलाकार या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.


पूर्णा इव्हेंट मॅनेजमेंट यांनी  हा कार्यक्रम आयोजित केला असून, पूर्णा इव्हेंट  हे कोल्हापुरातील एक दर्जेदार कार्यक्रमासाठी नावाजलेले नाव . गेल्या दोन तपाहून अधिक या ग्रुपच्या सर्वेसर्वा मंगला नियोगी विविध माध्यमातून नेहमीच अग्रेसर असतात. स्थानिक कलाकार तसेच देशपातळीवरील विविध कलाकारांना एकत्रित घेऊन दर्जेदार कार्यक्रम करने हाच पूर्णा इव्हेंट च्या मंगला नियोगी यांचा हातखंडा. गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळ्या संगीत रजनी घेत असतात. याचाच एक भाग म्हणून या वर्षी त्यांनी "ये बंधन तो" या नावाने २३ जून रोजी बहारदार गीतांची संगीत रजनी आयोजित केली आहे. त्याचा लाभ समस्त संगीत श्रोत्यांनी घ्यावा असेही कोल्हापूर ऑनलाईन  शी बोलताना मंगल नियोगी यांनी सांगितले . 


 तरी या कार्यक्रमाचा लाभ समस्त रसिक श्रोत्यांनी घ्यावा असेही आवाहन मंगला नियोगी यांनी केले . 


"ये बंधन तो"

२३ जून २०२४ 

वेळ : सायंकाळी ६ वाजता 

स्थळ: संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.