कोल्हापूर १० प्रमोद पाटील 

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलेला "८ दोन ७५" मराठी चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याची माहिती आज या चित्रपटातील संपूर्ण टीम ने पत्रकार परिषदेत दिली.


अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. "८ दोन ७५" म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल.


उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.