भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामध्ये रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद : 667 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामध्ये रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद : 667 रक्तदात्यांनी केले रक्तदान






कोल्हापूर दि.3 प्रमोद पाटील 

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरास 667 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. जरगनगर येथे भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली.   ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी वर्षभर होणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती देत रक्तदानाचे महत्व आणि रक्तदानाची सामाजिक गरज उपस्थितांना सांगितली. त्याचबरोबर ग्रंथालयाच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. 

आज दिवसभरामध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात जवळपास 250 हुन जास्त महिला व पुरुष यांना हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तदान करता आले नाही. त्यामुळे सातत्याने हिमोग्लोबिन तपासण्याचे कॅम्प घेऊन योग्य त्या घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले.

या रक्तदान शिबिरासाठी अर्पण ब्लड बँकेचे बाबासाहेब आगाव,  माधव ढवळीकर, डॉक्टर प्रकाश गाडवे, डॉ श्रीकांत नलवडे, डॉ राजेंद्र चिंचणीकर, रवी पाटील, सीपीआर रक्तपेढीचे डॉ प्रतीक शिंदे, रणजित केसरे, जयवंत कदम, प्रेमचंद्र कमलाकर यांच्यासह सहकारी यांनी रक्तदात्यांना योग्य मार्गदर्शन केले.

आजच्या रक्तदान शिबिरास महेश जाधव, नाना कदम, विजय जाधव, सुरेंद्र जैन, नरेश चंदवाणी, जयेश कदम, श्रीधर कुलकर्णी, अजिंक्य चव्हाण, राजसिंह शेळके, संग्रामसिंह निकम, मुकुंद भावे, केदार जोशी, अनिरुद्ध कोल्हापुरे, विजयसिंह खाडे-पाटील, प्रभाकर हेरवाडे, भरत खराटे, संमती मिरजे, सागर बगाडे, दिलीप सावंत, श्रीकांत पोतनीस, डॉ अश्विनी माळकर, माणिक-पाटील चुयेकर, मंगला निपाणीकर, रविंद्र मुतगी, आशिष कपडेकर, सुधीर देसाई  यांच्यासह भाजपा पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी-सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आजचे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी सचिन साळोखे, योगेश चिकोडे, मधुरिमा चिकोडे जयदीप मोरे, सुमित पाटील, श्रीधर नलवडे, कृष्णात आतवाडकर, प्रीतम यादव, विजय आगरवाल, अतुल चव्हाण, ओंकार खराडे, सिद्धू पिसे, तुषार पिष्टे, अरुण निकम यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.