चिमुकल्या हातांनी केलेल्या सत्काराने मंत्री हसन मुश्रीफ भारावले......

 चिमुकल्या हातांनी केलेल्या सत्काराने मंत्री हसन मुश्रीफ भारावले......

        


थोरा-मोठ्यांबरोबरच बाल पिढीशीही जिव्हाळ्याचा स्नेह

        

कोल्हापूर (कागल,) दि. ९ न्यूज डेस्क

मंत्री हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल गेली तीन दिवस त्यांच्या सत्कारासाठी अक्षरशः गर्दीचा महापूर वाहत आहे. या सगळ्या वातावरणात चिमुकल्यांनी केलेला त्यांचा सत्कार हा लक्षवेधी होता.

      

सकाळी सहापासूनच मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या घरी त्यांच्या अभिनंदनसाठी प्रमुख नेतेमंडळी, ग्रामपंचायतींचे सरपंच- पदाधिकारी, विविध संस्थां-संघटनांचे पदाधिकाऱ्यांसह सबंध जिल्हाभरातील नागरिकांची अक्षरशा रीघ लागली होती. गर्दी आटोपून श्री. मुश्रीफ नियमित रिवाजाप्रमाणे श्री. गहिनीनाथ गैबीपीर देवाच्या दर्शनासाठी आले. देवदर्शन घेऊन परतत असताना चार-पाच चिमुकल्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. चिमुकल्या हातांच्या सत्काराने श्री. मुश्रीफ भारावले. वयोवृद्ध थोरा-मोठ्यांपासून अगदी चिमुकल्या बालपिढीशी असलेल्या मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या ऋणानुबंधाची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.