वनताराकडून जगातील पहिल्या वन्यजीव आणि पशुवैद्यक जागतिक विद्यापीठाची स्थापना

 वनताराकडून जगातील पहिल्या वन्यजीव आणि पशुवैद्यक

जागतिक विद्यापीठाची स्थापना 



 

हे विशिष्ट हेतूंसाठी निर्माण केलेले आधुनिक काळातील गुरुकुल होणार असून वन्यजीव आणि पशुवैद्यक शिक्षण या क्षेत्रात देशाला जगात प्रमुख स्थान मिळावे हा यामागील हेतू आहे

 

जामनगर (गुजरात, भारत), १० एप्रिल २०२६: 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या वनतारा या जागतिक वन्यजीव संरक्षक संघटनेने गुजरातच्या जामनगर मध्ये वनतारा विद्यापीठ स्थापन केल्याची घोषणा केली आहे. वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यक शास्त्र या क्षेत्राला वाहून घेतलेले हे जगातील पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ असेल.

 

पशु कल्याण क्षेत्रातील शास्त्रीय संशोधन वाढवणे तसेच वन्यजीव संरक्षणाचे भवितष्य या क्षेत्रांवर या विद्यापीठाचा भर असेल. पशुवैद्यक औषधे, वन्यजीव संरक्षण आणि वन्यजीवांचे जतन या क्षेत्रात पुढील तज्ञ निर्माण करणे, हे या विद्यापीठाचे ध्येय आहे. या विद्यापीठाचे अभ्यासक्रम, या क्षेत्रातील भारताच्या परंपरागत ज्ञानाचा वापर करून, या क्षेत्रातील शिक्षणाचे विशिष्ट हेतूंवर आधारित आणि भविष्यकाळासाठी सज्ज असे मॉडेल तयार करतील.

 

आपण वन्यजीवांच्या सेवेसाठी सहानुभूती, ज्ञान आणि कौशल्य यांच्या साह्याने आपले मन तसेच संस्था कशा घडवतो यावर पशुसंवर्धनाचे भविष्य अवलंबून राहील. या वन्य जीवांना होणारा त्रास पाहणाऱ्या आणि त्यांची काळजी घेण्याच्या क्षेत्रात बरेच काही करण्याची आवश्यकता जाणणाऱ्या एका वैयक्तिक प्रवासातून वनतारा विद्यापीठ आकारास आले आहे. पुरातन नालंदा विद्यापीठाची मार्गदर्शक मूल्ये आणि ‘आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वत:’ हे ऋग्वेदातील बोधवाक्य, म्हणजेच आदर्श विचार सर्व दिशांनी आपल्याकडे येऊ दे, या बोधवाक्यानुसार, प्रत्येक जीवाचे संरक्षण करणारी नवी पिढी तयार करण्यासाठी हे विद्यापीठ कटिबद्ध आहे, असे अनंत अंबानी म्हणाले.

 

ही बोधतत्वे अधोरेखित करणारे दोन बिजोलिया पाषाण, विद्यापीठाच्या भूमिपूजनाच्या जागीच उभारले आहेत. पुरातन विंध्यन संस्कृतीची परंपरा सांगणारे हे पाषाण सध्याच्या बिहारमध्ये असलेल्या पुरातन नालंदा विद्यापीठाची परंपरा सांगतात. हे पाषाण भारताच्या ज्ञान आणि शिक्षणाच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत.

 

 

विद्यापीठाचा भूमिपूजन समारंभ हिंदू परंपरेनुसार झाला. यावेळी शिक्षण शास्त्र, वन्य जीव जतन आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते. यात अनंत अंबानी यांचे शिक्षक आणि त्यांना घडवणारे थोर व्यक्तिमत्वे हजर होती. जल, माती आणि पाषाण यांची धार्मिक परंपरागत पद्धतीने स्थापना करून त्याद्वारे प्रतिकात्मक पायाभरणी करण्यात आली. हे सर्व भाग, भारताच्या वेगवेगळ्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या ठिकाणांवरून म्हणजेच गवताळ भाग, जंगल, पाणथळ क्षेत्र, हिमालय आणि अन्य पर्वतरांगा येथून आणले होते. भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य भागातून आणलेले हे भाग, भारताच्या समृद्ध पर्यावरणाचे आणि देशाच्या समृद्ध नैसर्गिक वारशाच्या पायावर आधारित विद्यापीठ उभारण्याच्या दूरदृष्टीचे प्रतीक होते.

 

वनतारा विद्यापीठ, या क्षेत्रातील भिन्नभिन्न विद्या शाखांचे एकाच शैक्षणिक परियंत्रणेत एकत्रिकरण करेल. आजच्या जगातील वन्यजीव संरक्षण व्यवस्थेशी हा अभ्यासक्रम निगडित असेल. वनताराने या क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कामाच्या अनुभवाचा लाभ घेऊन हे विद्यापीठ, हा प्रत्यक्ष अनुभव आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात, व्यावसायिक प्रशिक्षणात आणि जागतिक आराखड्यात समाविष्ट करेल. प्राण्यांविषयीची दयाभावना, शास्त्र आणि वन्यजीवांचे जतन, या सर्व बाबी एकत्रित करून या विद्यापीठात, तज्ञ व्यावसायिकांनी वन्यजीव आणि त्यांच्या परियंत्रणेचे आरोग्य, यांच्याशी संबंधित गुंतागुंतीच्या आव्हानांवर मात करावी, त्यावर तोडगा काढावा, यासाठी त्यांना सज्ज केले जाईल.

 

या विद्यापीठात पदवीपूर्व, पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच विशेष अभ्यासक्रम असतील. यात वन्य जीव औषधे आणि शस्त्रक्रिया, पोषण त्यांची वर्तणूक शास्त्र, त्यांची अनुवंशिकता, साथीचे रोग, आरोग्य संरक्षणाचे धोरण तसेच नैसर्गिक पशुसंवर्धन पूरक वातावरण निर्मिती, यांचा समावेश राहील. वनताराच्या कामाशी सुसंगत अशी क्षमता असलेल्या विशेष महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठातर्फे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील दिली जाईल.

 

या विद्यापीठात अत्याधुनिक शैक्षणिक आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा, वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निवासी संकुल असेल. पशु संगोपन आणि आधुनिक पशुसंवर्धन पद्धती यांना सक्षम करण्यासाठी कृती आधारित संशोधनावर विद्यापीठ भर ठेवेल. संवर्धन क्षेत्रातील नव्या जुन्या पद्धतीचे एकत्रीकरण करून वन्यजीवांची नैसर्गिक जीवन पद्धती आणि वन्यजीवांची शास्त्रीय काळजी तसेच त्यांचे दीर्घकालीन कल्याण आणि व्यवस्थापन यांची सांगडही येथे घातली जाईल. पशुसंवर्धनाचे भविष्य हे महाविद्यालयातील वर्गांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, माणसांच्या सद्विवेक बुद्धीमध्ये तसेच जंगलांमध्ये निर्माण होईल हे ध्यानात घेऊन, वन्यजीव पशुवैद्यक शास्त्र आणि पशुसंवर्धन शिक्षण यांचे आधुनिकीकरण करण्याचा विद्यापीठाचा निर्धार आहे.

 

त्याचबरोबर वन्यजीव आरोग्य, प्राण्यांची निगा राखण्याच्या वातावरणाची निर्मिती आणि पशुसंवर्धन यांचे ज्ञानभंडार विकसित करून या क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि नवकल्पना यांच्यासाठी ते दीर्घकालीन व्यासपीठ म्हणून उपयोगात येईल, याचा प्रयत्नही याचवेळी विद्यापीठातर्फे केला जाईल.

 

दयाबुद्धीचे पशुसंवर्धन प्रशिक्षण सुरू करण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांची दखलही पायाभरणी समारंभात घेण्यात आली. या दृष्टीने 'वनतारा यूनिव्हर्सिटी फाऊंडिंग फेलोज' आणि 'एव्हरी लाइफ मॅटर्स' या शिष्यवृत्त्यांची घोषणाही करण्यात आली. ज्ञानाचा उपयोग केवळ प्रगतीसाठीच नव्हे तर संरक्षणासाठीही करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

वनतारा विद्यापीठ हे शैक्षणिक व्यवस्थेपेक्षाही वेगळ्या स्तरावर असल्याचे उद्दिष्ट अधोरेखित करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षणासाठी केवळ प्रशंसाच नव्हे तर ज्ञानव्यवस्था आणि प्रशिक्षित व्यक्तींची गरज असल्याचेही त्यातून स्पष्ट होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.