भाजपा तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध ठिकाणी साजरी

 भाजपा तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध ठिकाणी साजरी



कोल्हापूर  १४ (मिलिंद कुलकर्णी) 

भाजपा कोल्हापूरच्या वतीने आज विविध मागासवर्गीय वस्त्यांमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. 

सकाळी ९ वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी सचिव महेश जाधव यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अनुजा मोर्चा अध्यक्ष अनिल कामत, सरचिटणीस अमर साठे, सदानंद राजवर्धन, नगरसेविका रेखा उगवे यांची उपस्थिती होती. 

यानंतर वरील मान्यवरांनी मंडल निहाय असणाऱ्या जयंती कार्यक्रमाला  उपस्थिती दर्शवली यामध्ये प्रवीणचंद्र शिंदे यांनी लक्ष्मीपुरी येथे, अनिल कामत यांनी निर्माण चौक येथे, राजन पडळकर यांनी सदर बाजार, धीरज पाटील यांनी बावडा येथे, संतोष तिवडे शिवाजी पार्क, अमोल मांगले दौलत नगर, कुमार थोरात यादव नगर, सनी आवळे जवाहर नगर, माजी नगरसेवक दिलीप पवार यांनी कमान नगर, सचिन कुलकर्णी यांनी शाहूपुरी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाचे नियोजन करण्यात आले होते. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.