उजळाईवाडीत ‘गृहदामीनी महोत्सव २०२६’चे आयोजन
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम
कोल्हापूर (मिलिंद कुलकर्णी) ०२ :
: जागतिक महिला दिनानिमित्त उजळाईवाडी येथे ‘गृहदामिनी महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई सांस्कृतिक भवन, बापूसो पाटील पार्क, साई मंदिर, उज्ज्वलदिवाडी येथे रविवारी ८ मार्च रोजी हा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन सौ. प्रियांका श्रीनिवास माने यांनी केले आहे.
महिलांमधील कला, कौशल्य आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘पाककला स्पर्धा’ (विषय – महाराष्ट्राच्या पारंपरिक चवी), ‘पारंपरिक वेशभूषा स्पर्धा’ (ग्रामीण लूक), ‘केशभूषा स्पर्धा’ (पारंपरिक व जुन्या पद्धतीने) तसेच ‘वक्तृत्व स्पर्धा’ (विषय – पारंपरिक व आधुनिक स्त्री) यांचा समावेश आहे. सर्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकासाठी १५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक गिफ्ट हॅम्पर व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘खेळ सोन्याची नथ जिंकण्याचा’ ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी सोन्याची नथ (१०,००० रुपये), द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ (८,००० रुपये) आणि तृतीय क्रमांकासाठी सोन्याची नथ (७,००० रुपये) अशी बक्षिसे असणार आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
सायंकाळी ७ ते ८.३० दरम्यान विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार असून रात्री ९ ते १० या वेळेत डीजे अंकिता यांचा कार्यक्रम आणि ७.३० ते १० या वेळेत रंगीला ग्रुप डान्स शो सादर होणार आहे.
सर्व स्पर्धा उज्ज्वलदिवाडी परिसरातील महिलांसाठी मर्यादित असून प्रत्येक स्पर्धेसाठी प्रवेश फी ५० रुपये ठेवण्यात आली आहे. ‘खेळ सोन्याची नथ’ स्पर्धेसाठी प्रवेश फी १०० रुपये आहे. स्पर्धेसाठी किमान चार व पाहुणे बंधनकारक आहेत. अंतिम नोंदणीची मुदत ६ मार्च सायं. ५ वाजेपर्यंत आहे. खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही महिलांसाठी खुले राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी मो. ९५६१२ ५६७५७ व ८६२३० ३४४६१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



