राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरला संयुक्त विजेतेपद

 राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश  कबनूरकरला संयुक्त विजेतेपद



कोल्हापूर ०२ प्रमोद पाटील 

 खंडाळा पारगाव जिल्हा सातारा येथे मकरंद आबा पाटील चषक एक दिवसीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडली. 

या स्पर्धेत  कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकर याने ९ फेरीत ८ गुण मिळवत संयुक्त विजेतेपद पटकावले . रोख रक्कम १५०००/- आणि पारितोषिक असे या विजेतपदाचे स्वरूप होते .

 ऋषिकेश ची मोठी बहीण  शर्वरी कबनूरकर हिने  ९ पैकी ६ गुण मिळवून २८  वा क्रमांक  मिळवून १२०० रुपये बक्षीस व पारितोषिक मिळवले 

ती  के आय टी कॉलेज येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत आहे 

या स्पर्धेचे विजेतेपद  (प्रोग्रेसिव ८ गुणांसह)  मुंबईच्या आशिष जैन यांनी  रोख रक्कम २५००० तसेच पारितोषीक मिळविले

 स्पर्धेत एकूण तब्बल २००००० रकमेची ही स्पर्धा होती.  १०४आंतरराष्ट्रीय  मानांकित  खेळाडू नी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता  . एकूण २२६ खेळाडूंनी भाग घेतला होता. 


ऋषिकेश हा विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी  असून  या स्पर्धेमुळे फिडे 98.8 रेटिंगची कमाई केली असून त्यास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे मॅडम, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे सर यांचे प्रोत्साहन लाभले.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, बुद्धिबळ प्रशिक्षक कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.