नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात जल्लोषी स्वागत

 नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात जल्लोषी स्वागत



कोल्हापूर १ प्रमोद पाटील 

भाजपा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची नियुक्तीची घोषणा काल करण्यात आली याबद्दल आज भाजपा जिल्हा कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावतीने त्यांचा भव्य सत्कार आणि कार्यालय प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला 

राजारामपुरी येथून रॅली द्वारे जिल्हाध्यक्ष विजय जाधव कार्यालयात आले याप्रसंगी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी दिल्या.


खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र का सदस्य राहुल चिकोडे यांनी पुष्पहार घालून नूतन जिल्हाध्यक्षांचे स्वागत केले.

याप्रसंगी बोलताना प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले 30 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या विजय जाधव यांच्या फेरनिवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची मूल्ये व भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळापर्यंत नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं व भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेत यावी यासाठी विशेष परिश्रम घ्यावेत असेही नमूद केले. 


याप्रसंगी बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखरजी बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे ती समर्थपणे मी येणाऱ्या तीन वर्षांमध्ये पेलून भारतीय जनता पार्टीचा विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे नमूद केले.


याप्रसंगी गायत्री राऊत डॉक्टर राजवर्धन अशोक देसाई हेमंत आराध्य गणेश देसाई संतोष भिवटे राजसिंह शेळके अमर साठे उमाताई इंगळे माधुरी नकाते किरण नकाते धनश्री तोडकर संगीता खाडे मंगला निपाणीकर रोहित पवार अतुल चव्हाण गिरीश साळुंखे रुपाराणी निकम आजम जमादार संतोष माळी अनिल कामत भरत काळे शैलेश पाटील विजय अग्रवाल रोहित कारंडे प्रज्ञेश हमलाई सुमित पारखे अप्पा लाड अभय तेंडुलकर वैभव कुंभार प्रीतम यादव सुनील पाटील धीरज पाटील विशाल शिराळकर सचिन पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.